एक्स्प्लोर

SIP Date : एसआयपीद्वारे कोणत्या तारखेची गुंतवणूक फायदेशीर ठरते? रिटर्न वाढवण्यासाठी नेमकं काय महत्त्वाचं?

SIP : एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्या अनेकांना कोणत्या तारखेला केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल असा प्रश्न पडलेला असतो. याबाबत वित्तीय जाणकार काय म्हणतात ते पाहायला हवं.

SIP Date मुंबई : गुंतवणुकीच्या लोकप्रिय पद्धतींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्रकार एसआयपी हा आहे. मोठ्या संख्येनं गुंतवणूकदार एसआयपीद्वारे पैशांची गुंतवणूक करतात. एसआयपी म्हणजेच ठराविक रक्कम तुमच्याकडून म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये गुंतवण्यात येते. काही गुंतवणूकदारांना कोणत्या तारखेला एसआयपीद्वारे गुंतवणूक केली की जास्त रिटर्न मिळतात, असा प्रश्न पडतो.

Which SIP Date Better for SIP : एसआयपीसाठी योग्य तारीख कोणती?

एसआयपीसाठी सर्वाधिक चांगली तारीख कोणती याबाबत काही अभ्यास समोर आले आहेत. कोणत्याही महिन्यातील 1,10,25 तारखेला गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीत मिळणारा परतावा जवळपास सारखा असतो. वार्षिक 0.2 ते 0.3 टक्के फरक असतो. 10 हजार रुपयांची एसआयपी 12 टक्के सीएजीआरच्या रिटर्ननं केल्यास 20 वर्षात 98 लाखांचा फंड तयार होईल. यात 0.2 टक्क्यांचा विचार केल्यास यापेक्षा अधिक रक्कम काही हजारांची असेल.

एसआयपीद्वारे गुंतवणूक कोणत्या तारखेला करावी याचा विचार दीर्घकालीन गुंतवणूक करताना फारसा करावा लागत नाही. शॉर्ट टर्म गुंतवणुकीत त्याचा परिणाम दिसू शकतो. लाँग टर्म गुंतवणूक करताना एसआयपीची तारीख निवडताना देखील विचार केला पाहिजे.

वित्तीय सल्लागारांच्या मते, तुमचा पगार कधी जमा होतो याचा विचार करुन एसआयपी तारीख निवडावी. ज्यामुळं एसआयपीचं पेमेंट थांबणार नाही. एसआयपीच्या रकमेचं तीन भागात वर्गीकरण करावं, असा सल्ला देखील काही जाणकार देतात.

वित्तीय सल्लागारांच्या मते तुम्ही दरमहा जितक्या रकमेची एसआयपी करणार आहेत त्याचं तीन भागात विभाजन करुन तीन तारखांना गुंतवणूक करावी. ज्यामुळं शेअर बाजारातील घडामोडींचा फटका कमी प्रमाणात बसतो. उदा. तुम्ही 12000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर 5 तारखेला 4000, 15 तारखेला 4000 आणि 25 तारखेला 4000 रुपयांची गुंतवणूक करु शकता. यामुळं वेगवेगळ्या दिवशी एनएवीच्या हिशोबानं यूनिट मिळू शकतात.

एसआयपी करताना तारखेऐवजी कालावधी फार महत्त्वाचा असतो. म्हणजेच जितकी दीर्घकाळ एसआयपी सुरु ठेवली जाईल तितका जास्त फायदा होऊ शको. काही जणांकडून बाजारात घसरण झाल्यास एसआयपीद्वारे गुंतवणूक थांबवली जाते. ज्यामुळं नुकसान होतं. तसंकरता चांगला फंड निवडा, गुंतवणूक सुरु ठेवा आणि शिस्तीचं पालन करा.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
Embed widget