उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णालयात दाखल
Anant Ambani Covid Positive : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Anant Ambani Covid Positive : प्रसिद्ध उद्योगपती आणि जगात श्रीमंताच्या यादीत झळकणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) यांना HN रिलायंस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल अनंत अंबानी यांची प्रकृती खालावल्यानं ते एचएन रिलायन्स रुग्णालयात गेले होते. त्याला चौकशी करण्यास सांगण्यात आले आणि त्याचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्याला दाखल करण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) हे मुकेश अंबानी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. याशिवाय बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोन यांनीही अंबानींच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचं दर्शन घेतलं होतं.
अनंत अंबानी रिलायन्सच्या नव्या एनर्जी बिझनेसमध्ये सहभागी
गेल्या आठवड्यात झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानींचा नव्या एनर्जी व्यावसायात समावेश करण्याची घोषणा केली होती. याशिवाय त्यांनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमची कमान मोठा मुलगा आकाश अंबानीकडे आणि रिलायन्स रिटेल व्यवसाय मुलगी ईशा अंबानीकडे सोपवला आहे.
अनंत अंबानींसाठी दुबईतील सर्वात महागडं घर केलं खरेदी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीसाठी दुबईतील सर्वात महागडं घर खरेदी केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी चर्चेत आले होते. 80 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 640 कोटी भारतीय रुपयांमध्ये या घराचा करार झाल्याचं सांगण्यात आलं आहे.