Mukesh Ambani Reliance Deal : लंडनमध्ये अंबानींची मोठी डील; 'या' सेक्टरमध्ये वाजणार रिलायन्सचा डंका, कोणाचा बाजार उठणार?
Reliance Disney Deal : . मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या आठवड्यात लंडनमध्ये वॉल्ट डिस्ने कंपनीसोबत (रिलायन्स-डिस्ने डील) नॉन-बाइंडिंग टर्मवर स्वाक्षरी केल्याचे वृत्त आहे.
![Mukesh Ambani Reliance Deal : लंडनमध्ये अंबानींची मोठी डील; 'या' सेक्टरमध्ये वाजणार रिलायन्सचा डंका, कोणाचा बाजार उठणार? Mukesh Ambani Reliance Disney sign non binding agreement for Indian media operations merger said report Mukesh Ambani Reliance Deal : लंडनमध्ये अंबानींची मोठी डील; 'या' सेक्टरमध्ये वाजणार रिलायन्सचा डंका, कोणाचा बाजार उठणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/25/d62d3d588f6fd8d7a573cb6df22b20d01703516264434290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Reliance Disney Deal : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि देशातील आघाडीचे उद्योजक मुकेश अंबानी यांनी एक मोठा करार केला आहे. या करारामुळे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे मनोरंजन आणि मीडिया मार्केटवर वर्चस्व वाढणार आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance) गेल्या आठवड्यात लंडनमध्ये वॉल्ट डिस्ने कंपनीसोबत (Reliance Disney Deal) नॉन-बाइंडिंग टर्मवर स्वाक्षरी केल्याचे वृत्त आहे.
फेब्रुवारीमध्ये विलीनीकरणाची शक्यता
या करारावर बराच काळ चर्चा सुरू होती. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता मोठा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी भारतीय मीडिया आणि मनोरंजन बाजारपेठेत आपला दबदबा वाढवण्यासाठी अमेरिकन कंपनी वॉल्ट डिस्ने कॉर्पोरेशनशी चर्चा करत असल्याचे वृत्त होते. 'इकॉनॉमिक्स टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानींच्या कंपनीने लंडनमध्ये हा मोठा करार केला. या वृत्तानुसार, 51:49 स्टॉक आणि रोख विलीनीकरण फेब्रुवारी 2024 पर्यंत अंतिम केले जाण्याची अपेक्षा आहे.
अंबानींच्या हाती सूत्रे
रिलायन्स इंडस्ट्रीजला जानेवारी 2024 च्या अखेरीस हा करार निश्चित होण्याची अपेक्षा आहे. वृत्तानुसार, या डीलनंतर मुकेश अंबानींच्या रिलायन्सच्या हाती सगळी सूत्रे येतील. किमान 51 टक्क्यांसह सर्वात मोठा हिस्सा रिलायन्सचा असेल. विलीन झालेल्या या कंपनीत वॉल्ट डिस्नेची 49 टक्के भागीदारी असेल. हा करार गेल्या आठवड्यात झाला. JioCinema देखील या कराराचा एक भाग असेल असे सांगण्यात आले आहे.
करार करताना कोण होते उपस्थित?
लंडनमध्ये झालेल्या करारावरील स्वाक्षरीच्या वेळी वॉल्ट डिस्नेचे माजी सीईओ आणि सध्या सल्लागार म्हणून कार्यरत असणारे केविन मेयर आणि मुकेश अंबानी यांचे निकटवर्तीय विश्वासू समजले जाणारे मनोज मोदी हे उपस्थित होते. रिलायन्स समूहातील 'वायकॉम 18' ची स्टेप डाउन उपकंपनी तयार करण्याची योजना आहे. स्टॉक स्वॅपद्वारे ते स्टार इंडियामध्ये विलीन केले जाईल.
अॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, झी आणि सोनी यांची चिंता वाढणार
रिलायन्स आणि वॉल्ट डिस्नेच्या विलीनीकरणामुळे झी नेटवर्क, सोनी टीव्ही, अॅमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्सला थेट स्पर्धा होणार आहे सध्या, RIL चे Jio मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात अनेक अॅप्स आणि Viacom18 सह उपस्थित आहे.
जिओ आणि हॉटस्टारमध्ये होती स्पर्धा
या विलीनीकरणात जिओ सिनेमाचाही समावेश करण्यात आला आहे. त्याच्याकडे आयपीएलचे (Indian Premier League) ऑनलाइन हक्क आहेत. यापूर्वी हे अधिकार डिस्ने हॉटस्टारकडे होते. या क्षेत्रात अंबानींना केवळ डिस्नेकडूनच स्पर्धा होत होती. आयपीएलचे ऑनलाइन हक्क गेल्यानंतर डिस्ने हॉटस्टारचे युजर्स कमी होऊ लागले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)