Mukesh Ambani : मुकेश अंबानी लंडनमध्ये स्थायिक होणार? रिलायन्स समूहाने दिली 'ही' माहिती
Ambani london property : मुकेश अंबानी यांनी लंडनमध्ये आलिशान महल खरेदी केल्यानंतर ते कुटुंबीयांसह तिथेच स्थायिक होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Mukesh Ambani's new Home: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) सर्वेसर्वा, उद्योजक मुकेश अंबानी यांनी लंडनमध्ये आलिशान घर विकत घेतल्यानंतर तिथेच ते स्थायिक होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत काही माध्यमांनी वृत्तही दिले आहे. आता या चर्चेवर रिलायन्स समूहाने मोठी माहिती दिली आहे. मुकेश अंबानी लंडनमध्ये स्थायिक होण्याबाबतचे वृत्त निराधार असल्याचे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, अंबानी कुटुंबीय स्टोक पार्क लंडन येथे स्थायिक होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष अथवा त्यांच्या कुटुंबीयांची अशी कोणतीही योजना नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. अंबानी कुटुंबीय लंडन अथवा जगातील इतर कोणत्याही ठिकाणी स्थायिक होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
रिलायन्स उद्योग समूहाच्या RIIHL ने स्टोक पार्कमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. या पुरात्व मालमत्तेचा वापर हा गोल्फिंग आणि इतर क्रीडा प्रकार खेळण्यासाठी याचा वापर होणार आहे. त्यासाठी स्थानिक कायदे आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात येणार आहे. ही मालमत्ता वेगाने वाढत जाणाऱ्या 'कन्ज्यूमर बिझनेस'ला लक्षात घेता खरेदी करण्यात आली आली आहे.
Reliance Industries Limited (RIL) statement on media report claiming Mukesh Ambani and family to partly reside in London. pic.twitter.com/BuRTJOuOKw
— ANI (@ANI) November 5, 2021
मुकेश अंबानी हे कुटुंबीयांसह लंडन येथे स्थायिक होणार असून मुंबई, लंडन दरम्यान व्यवसाय-उद्योगाच्या निमित्ताने प्रवास करणार असल्याचे वृत्त समोर आले होते.
कसा आहे अंबानींचा लंडनमधील महल?
मुकेश अंबानी यांनी लंडनमधील बकिंगहॅमशायरमधील स्टोक पार्क (Buckinghamshire, Stoke Park) या ठिकाणी 300 एकरची जागा विकत घेतली असून त्या ठिकाणी रहायला जाणार आहेत. या परिसरात एक ऐतिहासिक वास्तू असून त्या ठिकाणी अंबानी परिवार आता वास्तव्यास असेल. तब्बल 49 बेडरूम्स असलेला स्टोक पार्कमधील हा महल मुकेश अंबानींनी 592 कोटी रुपये देऊन खरेदी केल्याचं वृत्त आहे. अंबानींनी खरेदी केलेल्या या अलिशान महलामध्ये 49 बेडरूम्स आहेत. या महलात एक मिनी हॉस्पिटल असून ते सुसज्ज सोईंनी युक्त आहे. ही वास्तू खुल्या वातावरणात आहे. ही वास्तू खूप जुनी असून 1908 सालापर्यंत ती खासगी मालमत्ता होती. त्यानंतर या वास्तूचे एका क्लबमध्ये रुपांतर करण्यात आलं. यामध्ये अलिशान हॉटेल आहे. तसेच या वास्तुच्या आवारात एक गोल्फ क्लबदेखील आहे.
संबंधित वृत्त:
Mukesh Ambani : मुकेश अंबानींचे आता 'नमस्ते लंडन'! विकत घेतला 49 बेडरूमचा अलिशान महल