Muhurat Trading 2024: मुहूर्त ट्रेडिंगला भारतीय शेअर बाजारात तेजी, ऑटो कंपन्या-बँकांच्या शेअरमध्ये उसळी, गुंतवणूकदार मालामाल
Muhurat Trading 2024: दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक तास मुहूर्त ट्रेडिंग केलं जातं. बीएसई आणि एनएसईवर अनुक्रमे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी पाहायला मिळाली.
Diwali Muhurat Trading 2024 मुंबई : संवत 2081 च्या पहिल्या व्यवहाराच्या सत्रामध्ये भारतीय शेअर बाजारात शानदार तेजी पाहायला मिळाली. एका तासाच्या ट्रेडिंगमध्ये बीएसई सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टीमध्ये उसळी पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी केल्यानं सेन्सेक्स 500 अकांच्या उसळीसह 79893 वर पोहोचला तर निफ्टीमध्ये 150 अंकांची वाढ पाहायला मिळाली. निफ्टी 24,353 अंकांवर ट्रेड करत आहे.
तेजी असलेले शेअर्स
टमुहूर्त ट्रेडिंगमध्ये बाजारात विविध क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. ऊर्जा,बँकिंग,आयटी, ऑटो, मेटल्स, एनर्जी, फार्मा, हेल्थकेअर, ऑयल अँड गॅस या क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. याशिवाय मिड कॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रात देखील तेजी पाहायला मिळाली. आजच्या सत्रात ऑटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा च्या शेअरमध्ये 2.92 टक्के, टाटा मोटर्स 1.35 टक्के, एनटीपीसी 1.18 टक्के एक्सिस बँक 1.11 टक्के, टाटा स्टील 0.94 टक्के तेजी पाहायला मिळाली. तर, सन टीवी 1.16 टक्के, डॉ. रेड्डी 0.75 टक्के, डॉ. लाल पॅथलॅब 0.77 टक्के घसरण पाहायला मिळाली.
आजच्या सत्रात बीएसईवरील लिस्टेड स्टॉकची मार्केट कॅप 448.83 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी बाजार बंद झाला ती 444.73 लाख कोटी रुपयांवर होती. संवत 2081 च्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 4.10 लाख कोटी रुपयांची वाढ पाहायला मिळाली. संवत 2080 ते संवत 2081 दरम्यान भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 128 लाख कोटींची वाढ पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात गुंतवणूकदारांनी संवत 2080 मध्ये सर्वाधिक कमाई केली आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मुहूर्त ट्रेडिंगनिमित्त विशेष पुजा आयोजित करण्यात आली होती. एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिष चौहान यांनी दिवाळीनिमित्त गुंतवणूकदारांना शुभेच्छा दिल्या. संवत 2081 यापर्वीच्या संवत 2080 तुलने चांगलं राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.गुंतवणूकदारांनी चांगल्या प्रकारे गुंतवणूक करावी, कोणत्याही टिप्स, अफवा, व्हाटसअप मेसेजवर लक्ष देऊ नका असा सल्ला देखील त्यांनी दिला.
इतर बातम्या :
(या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. तुम्हाला प्रत्यक्ष गुंतवणूक करायची असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा आणि मगच गुंतवणूक करा.)