मोठी बातमी! परभणीच्या जिंतुर बाजार समितीच्या संचालक मंडळानं केला 33 लाखांचा गैरव्यहार, 14 जणांवर गुन्हा दाखल
Jintur Agricultural Market Committee News : जिंतुर बाजार समितीच्या (Jintur Agricultural Market Committee) संचालक मंडळानं 33 लाखांचा गैरव्यहार केला आहे.
Jintur Agricultural Market Committee News : परभणी (Parbhani) जिल्ह्याच्या दृष्टीनं एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जिंतुर बाजार समितीच्या (Jintur Agricultural Market Committee) संचालक मंडळानं 33 लाखांचा गैरव्यहार केला आहे. याप्रकरणी14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जिंतुरच्या सर्व भ्रष्ट संचालक मंडळावर कारवाई करा अशी मागणी गंगाधर बोर्डीकर यांनी केली आहे.
परभणीच्या जिंतुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासक पदावर असताना अवैध प्लॉट विक्री, प्लॉट शिल्लक नसताना बनावट प्लॉट तयार करून विक्री करणे, रोड लाइट, बाग बगिचाचा खर्च, बांधकाम खर्च, गोदामातील भंगार विक्री, प्रवास खर्च आदींमध्ये गैरव्यवहार करुन 33 लाख 37 हजार 466 रुपयांचा अपहार झाला होता. याप्रकरणी परभणीच्या जिंतुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 11 संचालकासह अभियंता सचिव आणि रोखपालवर जिंतूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा वेगवेगळ्या कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूरचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी रीतसर जिंतूर पोलीसमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या सर्व भ्रष्ट संचालक मंडळींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यमान बाजार समिती प्रशासक गंगाधर बोर्डीकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, संभाजीनगर, परभणी, हिंगोलीतील शेतकऱ्यांचे नुकसान