Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका, 100 अब्ज डॉलरचं नुकसान
Meta Shares Down : मेटा (Meta) कंपनीचे मालक आणि फेसबुकचे (Facebook) संस्थापक मार्क झुकरबर्गला (Mark Zuckerberg) मोठा आर्थिक फटका बसला आहे. 13 महिन्यांमध्ये मार्क झुकरबर्गला 100 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे.
Meta Shares Down : मेटा (Meta) कंपनीचे मालक आणि फेसबुकचे (Facebook) संस्थापक मार्क झुकरबर्गला (Mark Zuckerberg) मोठा आर्थिक फटका बसला आहे. 13 महिन्यांमध्ये मार्क झुकरबर्गला 100 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. मेटा प्लॅटफॉर्मच्या कमाईत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या तिमाहीमध्ये मेटा प्लॅटफॉर्मच्या कमाईमध्ये 11 अब्ज डॉलरची घट झाली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीपासून मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसल्याचं दिसत आहे. यामुळे झुकरबर्गला संपत्तीत मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे. जगातील अनेक श्रीमंत व्यक्तींना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. या यादीत मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्गचं नाव आघाडीवर आहे.
झुकरबर्गला 100 अब्ज डॉलर पेक्षा जास्त नुकसान
मेटा प्लॅटफॉर्मने दुसऱ्या तिमाहीत खास कमाई करता आलेली नाही. यामुळे झुकरबर्गच्या संपत्तीत 11 अब्ज डॉलरची घट झाली आहे. मागील 13 महिन्यांत झुकरबर्गच्या एकूण संपत्तीचे 100 अब्ज डॉलर पेक्षा जास्त नुकसान झालं आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, झुकेरबर्गची संपत्ती आता 38.1 अब्ज डॉलर्स आहे. सप्टेंबर 2021 मध्ये झुकेरबर्गची संपत्ती 142 अब्ज डॉलर्स होती. त्यामुळे यावरून झुकरबर्गच्या संपत्तीत मोठी घसरण झाल्याचं दिसून येत आहे.
As Mark Zuckerberg focuses on the metaverse, his net worth has tumbled by more than $100 billion in just 13 months, more than any other billionaire’s this year https://t.co/NzTKe4LGcu pic.twitter.com/vZUGLvqbtr
— Bloomberg Quicktake (@Quicktake) October 28, 2022
सलग दुसऱ्या तिमाहीत मेटा कंपनीचा महसूल घसरला आहे. मेटा कंपनीचा वार्षिक महसूल गेल्या वर्षाच्या तुलनेत 4.5 टक्क्यांनी घसरला आहे. मेटाच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये मेटाचे शेअर्स 25 टक्क्यांनी खाली घसरले होते.
एका झटक्यात लाखो फॉलोअर्स गायब
मेटा कंपनीच्या मालकीच्या फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक युजरचे फॉलोअर्स कमी झाले आहेत. ज्यांच्या अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स होते त्यांची संख्या कमी होऊन फक्त 10 हजारांवर आली आहे. फक्त फेसबुक युजर्सचेच नाही तर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या फॉलोअरमध्ये देखील लक्षणीय घट झाले आहे. 11 कोटी नऊ लाख फॉलोअर्स असलेल्या झुकेरबर्गचे आता केवळ 9 हजार 994 इतकेच फॉलोअर्स उरले आहेत. परंतु, यातील काही युजर्सचे फॉलोअर्स रिकव्हर झाले आहेत. फॉलोअर्स कमी झाल्यामुळे अनेकांनी फेसबुकवरून आपले अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फॉलोअर्स कमी होण्याचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही.