एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

AGI : इलॉन मस्कने मानवाच्या मेंदूत चीप बसवली, आता मार्क झुकरबर्ग त्याच्या 6 लाख चिप्सच्या तंत्रज्ञानाने सर्वांची झोप उडवणार

Elon Musk vs Mark Zuckerberg: इलॉन मस्कच्या मानवी मेंदूतील चीपला मार्क झुकरबर्गचं आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सच्या (AGI) माध्यमातून उत्तर मिळणार असून या क्षेत्रातही मोठी स्पर्धा दिसण्याची शक्यता आहे.

Elon Musk vs Mark Zuckerberg : इलॉन मस्कच्या न्यूरालिंक ब्रेन चिपने (Neuralink Brain Chip) संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. आता फेसबुकचा (Facebook) मालक मार्क झुकेरबर्गने त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. Meta च्या माध्यमातून झुकरबर्ग आता सुमारे 6 लाख चिप्ससह आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (AGI) प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत आहे. 

जगात कोणतेही क्षेत्र असो, प्रत्येकाची एकमेकांसोबत स्पर्धा सुरू असल्याचं दिसून येतंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रही त्याला काही अपवाद नाही. तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन दिग्गज, म्हणजे X (पूर्वीचे ट्विटर) मालक इलॉन मस्क  आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे एकमेकांना मागे टाकण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. अलीकडेच इलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीने एका व्यक्तीच्या मेंदूमध्ये मेंदूची चिप बसवली होती. या चिपची जगभर चर्चा झाली. आता मार्क झुकेरबर्गनेही त्यासाठी मोठी योजना आखली आहे. 

न्यूरालिंक हे स्टार्टअप आहे जे इलॉन मस्क यांनी 2016 मध्ये सुरू केले होते. त्याची मेंदूची चिप मानवी कवटीत रोपण केलेल्या नाण्याएवढं एक यंत्र आहे. ते अत्यंत बारीक तारांच्या माध्यमातून मेंदूशी जोडलेले असते. ही चिप ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस (BCI) बनवते.

न्यूरालिंक मेंदू चिप काम

इलॉन मस्क यांनी ही ब्रेन चिप एका खास उद्देशाने तयार केली आहे. याद्वारे व्यक्ती आपल्या विचारानुसार स्मार्टफोन, लॅपटॉप या उपकरणांवर नियंत्रण ठेवू शकते. हे तंत्रज्ञान ब्लूटूथ कनेक्शनसह कार्य करते. त्याच्या पहिल्या उत्पादनाचे नाव आहे टेलीपॅथी. दुसरीकडे, मार्क झुकरबर्ग 6 लाख चिप्ससह काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत आहे.

मार्क झुकरबर्ग हे तंत्रज्ञान तयार करणार 

मार्क झुकेरबर्गने जाहीर केले की मेटा अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे जे अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (AGI) असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे नाव आपण ऐकले असेलच, कदाचित अनेकांनी AI चा वापरही केला असेल. जर एजीआय खरोखरच विकसित असेल तर ते एआयपेक्षा अधिक शक्तिशाली असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

6 लाख चिप्ससह AGI प्रत्यक्षात येईल

एजीआयवर जगभरात संशोधन सुरू आहे. मार्क झुकरबर्गने सांगितले की, AGI तयार करण्यासाठी, FAIR आणि GenAI टीम एकत्र आणून काम केले जाईल. नवीन तंत्रज्ञानाचा फायदा सर्वांना होईल. सध्या कंपनी नेक्स्ट जनरेशन मॉडेल लामा 3 चे प्रशिक्षण देत आहे. झुकेरबर्गने सांगितले की, या वर्षापर्यंत AGI साठी 3.50 लाख चिप्स उपलब्ध करून दिल्या जातील.

एकूण, AGI 6 लाख चिप्सद्वारे विकसित केले जाईल. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (AGI) म्हणजे ते मानवी मेंदूप्रमाणेच काम करेल. ते माणसासारखा विचार करेल, समजून घेईल आणि त्यानुसार वागेल. त्यात माणसांसारखी बुद्धी असेल. त्यामुळे जगभरातील अनेक तंत्रज्ञान तज्ज्ञांनी एजीआयबाबत चिंता व्यक्त केली आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्रABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठरावBaba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
Embed widget