एक्स्प्लोर

Investment In Maharashtra: रायगडमध्ये होणार ExxonMobil चा भारतातील ल्युब्रिकंट्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांट; 900 कोटींची गुंतवणूक

Investment In Maharashtra:  ExxonMobil च्यावतीने रायगडमध्से प्लांट उभारणार आहे. सुमारे 900 कोटीची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

Investment In Maharashtra:  रायगडमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या इसांबे औद्योगिक क्षेत्रात ल्युब्रिकंट्स उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास INR 900 कोटीची (USD$110 दशलक्ष) गुंतवणूक होणार आहे. ExxonMobil या कंपनीच्या मार्फत ही गुंतवणूक करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंपनीने आज ही घोषणा केली.

उत्पादन, पोलाद, उर्जा, खाणकाम आणि बांधकाम, तसेच प्रवासी आणि व्यावसायिक वाहन विभागातील औद्योगिक क्षेत्रांमधील वाढत्या देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यासाठी वार्षिक 159, 000 किलोलिटर ल्युब्रिकंट्स तयार करण्याची क्षमता या प्लांटमध्ये असणार आहे. वर्ष 2025 च्या अखेरीस त्याचे कार्य सुरू होण्याची अपेक्षा आहे.

आकर्षक गुंतवणुकीच्या वातावरणामुळे महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र आहे आणि आमच्या ल्युब्रिकंट्स प्लांटसाठी नैसर्गिक उत्तम पर्याय आहे, असे भारतातील ExxonMobil च्या संलग्न कंपन्यांचे प्रमुख कंट्री व्यवस्थापक मॉन्टे डॉब्सन म्हणाले.

“मेक इन इंडिया” उपक्रमाला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी, प्लांट बेस स्टॉक, अॅडिटीव्ह आणि सर्व पॅकेजिंगचा मोठा भाग स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात देईल. बांधकामाच्या टप्प्यात सुमारे 1200 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

भारतातील उच्च-कार्यक्षमता ल्युब्रिकंट्स पुरवठादारांपैकी एक म्हणून आमचे स्थान मजबूत करण्याच्या दिशेने हे एक बदलाचे आणि महत्त्वाचे पाऊल उचलल्याने कंपनीने म्हटले. स्थानिक पातळीवर उत्पादन केल्याने आमची पुरवठा साखळी सुलभ होईल, ज्यामुळे आम्हाला आमच्या भारतीय ग्राहकांच्या आणि उपभोक्त्यांच्या गरजा अधिक सहजतेने पूर्ण करता येतील. भारताच्या विस्ताराच्या कथेला पाठिंबा देण्याच्या आमच्या वाढत्या भूमिकेबद्दल आम्ही उत्साहित आहोत,  असे ExxonMobil Lubricants Pvt. Ltd. चे सीईओ विपिन राणा म्हणाले.

ल्युब्रिकंट्स तंत्रज्ञानातील जगातील अग्रगण्य ब्रँड म्हणून, ExxonMobil ची Mobil-ब्रँडेड इंजिन ऑईल, ग्रीस आणि ल्युब्रिकंट्स यांची उत्पादने मागील अनेक वर्षांपासून भारताच्या ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी ऊर्जा कार्यक्षमता, उत्पादकता आणि टिकाऊपणा वाढवत आहे. कंपनी भारताच्या LNG चा एक प्रमुख पुरवठादार देखील आहे. कंपनीची इतर रासायनिक उत्पादने भारतीय उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.

 ExxonMobil मागील तीन दशकांपासून भारतात कार्यरत आहे. कंपनीने 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात द्रवरूप नैसर्गिक वायूचा (LNG) पहिला पुरवठा आणला आणि आता ती देशाचा एक प्रमुख LNG पुरवठादार आहे, ज्यामुळे गॅस-आधारित अर्थव्यवस्थेकडे त्याचे संक्रमण पुढे नेण्यात मदत होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Embed widget