एक्स्प्लोर

डिसेंबरमध्ये खात्यात 6100 रुपये येणार? लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार?

Maharashtra : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर विविध योजनांची अंमलबजावणी पुन्हा सुरु होईल.

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो. केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान योजना, महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीन योजना महत्त्वाच्या आहेत. या योजनांद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. डिसेंबर महिन्यात या योजनांचा लाभ दिला जाऊ शकतो. पीएम किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6 वा हप्ता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता देखील डिसेंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो. या तिन्ही योजनांचे लाभार्थी ज्या कुटुंबात असतील त्यांना डिसेंबर महिन्यात 6100 रुपये मिळू शकतात. 

6100 रुपये कसे मिळणार?  

केंद्र सरकारतर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेद्वारे तीन हप्त्यांमध्ये एका वर्षामध्ये 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता मिळू शकतो. त्याचे शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळू शकतात. याशिवाय राज्य सरकारनं केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरु केली होती, त्या योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांना पाच हप्त्यांमध्ये रक्कम देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या योजनेचा सहावा हप्ता मिळाल्यास ते देखील 2000 रुपये असे एकूण शेतकऱ्याला किंवा शेतकरी महिलेला 4 हजार रुपये मिळतील. याशिवाय महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असल्यास तिला महायुतीच्या आदेशाप्रमाणं 1500 रुपयांमध्ये 600 रुपयांची वाढ केल्यास 2100 रुपये मिळतील, असे एकूण 6100 रुपये  लाभार्थी कुटुंबाला किंवा शेतकरी महिलेला 6100 रुपये मिळू शकतात. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार? 

महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये पाठवले जातात. महायुतीनं निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्क्म वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन महायुती सरकारनं पाळल्यास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 2100 रुपये द्यावे लागणार आहेत. 

दरम्यान, या योजनांशिवाय राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून देखील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी  बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, आयटीआय आणि पदविका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना 8 हजार रुपये तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी 10 हजार रुपये दिले जातात. 

इतर बातम्या :

EPFO 3.0 Update लवकरच येणार, पीएफचे पैसे ATM वरुन काढता येणार, मोठी अपडेट समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Embed widget