LIC Listing LIVE : एलआयसीचा शेअर डिस्काउंटमध्ये लिस्ट, जाणून घ्या प्रत्येक अपडेट्स
LIC Listing Live: एलआयसी कंपनी आज शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. अपेक्षेपेक्षा कमी दरात एलआयसीची लिस्टिंग झाल्याने गुंतवणुकदार संभ्रमात आहेत. तज्ज्ञांनी दीर्घकाळ गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे.
LIVE
Background
LIC Listing Live : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा कंपनी (LIC) आज शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. शेअर बाजारात एलआयसी आठ टक्क्यांच्या डिस्काउंट दराने लिस्ट झाला आहे. बीएसईवर एलआयसीचा शेअर दर 867.20 रुपये आणि एनएसईवर 872 रुपये प्रति शेअर या दरावर लिस्ट झाला आहे. एलआयसीने आपल्या प्रति शेअरसाठी 949 रुपये इतकी किंमत निश्चित केली होती. केंद्र सरकारने एलआयसीमधील आपला 3.5 टक्के हिस्सा विकला आहे.
एलआयसी लिस्टिंगच्या ऐतिहासिक कार्यक्रमाला 'डिपम'चे सचिव तुहिनकांता पांडे, एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार, बीएसईचे अध्यक्ष आशिष चौहान आदींसह इतर मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.
एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) विक्रमी सहा दिवस बोलीसाठी खुला होता. एलआयसीच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभला. मागील आठवड्यात एलआयसी आयपीओचे वाटप करण्यात आलं होतं. परदेशी गुंतवणुकदारांनी एलआयसीच्या आयपीओकडे पाठ फिरवली होती. मात्र, भारतातील गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओ प्रीमियमचा दर सुरुवातीच्या काही दिवसांत चांगला वधारला होता. त्यानंतर हा प्रीमियम दर घसरू लागला होता. एलआयसीची लिस्टिंग सवलतीच्या दरात होण्याचे संकेत ग्रे मार्केटमधून मिळत होते. त्यानंतर आज एलआयसी शेअर डिस्काउंटमध्ये लिस्ट झाल्याने गुंतवणुकदारांमध्ये काही निराशेचे वातावरण आहे.
एलआयसी IPO ला चांगला प्रतिसाद
एलआयसी आयपीओला गुंतवणुकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक सब्सक्रिप्शन पॉलिसीधारकांसाठी राखीव असलेल्या कोट्यात झाले. पॉलिसीधारकांसाठीच्या कोट्यात 6.12 पटीने सब्सक्रिप्शन झाले होते. त्याच वेळेस एलआयसीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यात 4.4 पटीने सब्सक्रिप्शन झाले होते.
एलआयसी देशातील पाचवी मोठी कंपनी
उद्या एलआयसी शेअर बाजारात डिस्काउंटमध्येही लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य (मार्केट कॅप) 6 लाख कोटींहून अधिक राहण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास, एलआयसी ही शेअर बाजारात लिस्ट होणारी भारतातील पाचवी मोठी कंपनी ठरणार आहे. बाजार भांडवल दराच्या मूल्यानुसार, सध्या एलआयसीपेक्षा रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांचे बाजार भांडवल अधिक आहे.
एलआयसीची निराशाजनक सुरुवात; गुंतवणुकदारांना 42 हजार कोटींचा फटका
बहुप्रतिक्षित असलेल्या एलआयसीचा आयपीओ शेअर बाजारात आज सूचीबद्ध (लिस्टिंग) झाला. शेअर बाजारात लिस्ट होताना एलआयसीचा शेअर जवळपास 9 टक्के डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला. एलआयसीच्या या निराशाजनक लिस्टिंगचा फटका गुंतवणुकदारांना बसला आहे. एलआयसीने आपल्या प्रति शेअरची किंमत 949 रुपये निश्चित केली होती. मात्र, डिस्काउंट लिस्टिंगमुळे गुंतवणुकदारांना 42 हजार 500 कोटींचा फटका बसला आहे.
LIC Listing : निराशाजनक लिस्टिंगचा एलआयसीला फटका, बाजार भांडवली मूल्यात घसरण
LIC Listing : निराशाजनक लिस्टिंगचा एलआयसीला फटका बसला आहे. एलआयसीच्या बाजार भांडवली मूल्यात घसरण झाली आहे.
LIC Listing : एलआयसीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक योग्य ठरणार: गिरीराजन मुरुगन
LIC Listing : विमा क्षेत्रात एलआयसीची गुंतवणूकही दीर्घकाळासाठी उत्तम आहे. गुंतवणुकदारांनी लिस्टिंग नफ्याकडे पाहता नाही असे FundsIndia चे सीईओ गिरीराजन मुरुगन यांनी म्हटले. एलआयसी कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. सध्या बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम एलआयसीच्या शेअर दरावर झाला असल्याचेही त्यांनी म्हटले.
LIC listing : शॉर्ट टर्ममध्ये फायदा मिळण्याची शक्यता कमी, तज्ज्ञांचे मत
LIC listing : शॉर्ट टर्ममध्ये फायदा मिळण्याची शक्यता कमी, शॉर्ट गुंतवणुकदारांनी पोर्टफोलिओत सुधारणा करावी; तज्ज्ञांचे मत
LIC Share Price : लिस्टिंग झाल्यानंतरच्या तासाभरात एलआयसी शेअर दर 900 रुपये प्रति शेअर दर इतका
LIC Share Price: लिस्टिंग झाल्यानंतरच्या तासाभरात एलआयसी शेअर दर 900 रुपये प्रति शेअर दर इतका झाला.