LIC News : LIC एजंट्ससाठी मोठी बातमी! नव्या वर्षाच्या आधीच दोन लाखांचा फायदा
LIC Agents : हे नवे नियम 6 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात वित्त मंत्रालयाने एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या.
LIC Latest News : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) आपल्या एजंट्सना नव्या वर्षाच्या आधी मोठी भेट दिली आहे. एलआयसीने आपल्या एजंट्सच्या ग्रॅज्युएटी रक्कमेत वाढ केली आहे. या निर्णयामुळे एलआयसी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी ही तीन लाखांहून वाढून आता 5 लाख रुपये झाली आहे. याबाबत सरकारने अधिसूचनाही जारी केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एलआयसीने शेअर बाजारालाही याबाबत माहिती दिली आहे. हे नवे नियम 6 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात वित्त मंत्रालयाने एलआयसी एजंट (LIC Agent)आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या.
सप्टेंबरमध्ये केली होती घोषणा
सरकारने सप्टेंबरमध्ये ग्रॅच्युएटीची मर्यादा वाढवली आहे. याशिवाय नूतनीकरण आयोग आणि मुदत विमा संरक्षणाशी संबंधित अटींमध्येही बदल करण्यात आला आहे. यासाठी एलआयसी (एजंट) नियम 2017 आदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. एलआयसी एजंटसाठी ग्रॅच्युएटीची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली.
शेअर बाजारला दिली माहिती
अर्थ मंत्रालयाने सप्टेंबर महिन्यात एलआयसी एजंट्स आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी ग्रॅज्युएटी मर्यादा आणि कुटुंबासाठी असलेली पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या योजनांना मंजुरी दिली होती. नूतनीकरण कमिशन पुनर्संचयित केल्याने एजंटांना मोठा दिलासा मिळेल. सध्या जुन्या एजन्सीने केलेल्या कोणत्याही व्यवसायाचा फायदा त्यांना घेता येत नव्हता. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.
एजंटांना नूतनीकरण कमिशन मिळेल
LIC ने नूतनीकरण कमिशन मिळविण्यासाठी पात्र असलेल्या पुनर्नियुक्त एजंट्सचा देखील विचार केला आहे. सध्याच्या एलआयसीच्या नियमांनुसार, एजंटना जुन्या एजन्सीच्या अंतर्गत कोणत्याही व्यवसायावर नूतनीकरण कमिशन मिळण्याचा अधिकार नाही. एजंट्ससाठी टर्म इन्शुरन्स कव्हर रुपये 3,000 ते 10,000 रुपये होते, ते 25,000-1,50,000 रुपये करण्यात आले आहे. यामुळे एजंटच्या कुटुंबियांना उत्तम सुरक्षा कवच मिळेल. मंत्रालयाने LIC कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 30 टक्के दराने कौटुंबिक निवृत्ती वेतन देण्यास मान्यता दिली आहे.
13 लाख एलआयसी एजंटना फायदा होईल
13 लाखांहून अधिक एजंट आणि LIC च्या 1,00,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नवीन नियमांचा फायदा होणार आहे. एलआयसीचा व्यवसाय वाढवण्यात हे एजंट महत्त्वाची भूमिका बजावतात. भारताच्या विमा बाजारपेठेत एलआयसीचा मोठा वाटा आहे.
LIC ची सुरुवात 1956 मध्ये 5 कोटी रुपयांच्या भांडवलाने झाली होती. आज ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. कंपनीची उलाढाल 40.81 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. एलआयसीकडे विश्वासार्ह विमा कंपनी म्हणून समजले जाते. देशातील गावागावांमध्ये एलआयसीचे विमाधारक आहेत.