1, 2, 5, 10 रुपयांच्या नाण्यांबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या सविस्तर माहिती
आजच्या काळात प्रत्येकाच्या खिशात काही ना काही पैसे असतात. पण आपल्याकडे असणाऱ्या पैशांबद्दल (Money) आपल्याला अनेक गोष्टी माहित नसतात.
Business News : आजच्या काळात प्रत्येकाच्या खिशात काही ना काही पैसे असतात. पण आपल्याकडे असणाऱ्या पैशांबद्दल (Money) आपल्याला अनेक गोष्टी माहित नसतात. तुमच्या खिशात देखील 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नाणी असतील. पण, तुम्हाला या नाण्यांबद्दल काही गोष्टी माहित आहेक का? नाण्यावर असलेल्या प्रत्येक चिन्हाला एक अर्थ असतो. अनेक लोकांना याबाबत माहिती नसते. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
भारतात चार टांकसाळ
भारतात चार टांकसाळ आहेत, ज्यांना नाणी बनवण्याचा अधिकार आहे. यामध्ये मुंबई टांकसाळ, कलकत्ता टांकसाळ, हैदराबाद टांकसाळ आणि नोएडा टांकसाळ आहे. येथूनच नाणी बाजारात येतात. देशातील सर्वात जुनी टांकसाळ कलकत्ता आणि मुंबई टांकसाळ आहे. या दोन्हींची स्थापना 1859 साली ब्रिटिश सरकारने केली होती.
टांकसाळ म्हणजे कारखाना आहे. जिथे देशाच्या सरकारद्वारे किंवा त्याद्वारे दिलेल्या अधिकाराने चलने तयार केली जातात. हैदराबाद टांकसाळ हैदराबादी निजाम सरकारने 1903 मध्ये स्थापन केली आहे. 1950 मध्ये भारत सरकारने ते आपल्या ताब्यात घेतले.
नोएडा टांकसाळची स्थापना 1986 मध्ये झाली आणि 1988 पासून स्टेनलेस स्टीलच्या नाण्यांचे उत्पादन सुरू केले. तर मुंबई टांकसाळ हीदेखील भारतातील सर्वात जुन्या टांकसाळांपैकी एक आहे. ती ब्रिटिशांनी बांधली होती. त्या काळीही मुंबई हे आर्थिक बाबींच्या दृष्टीने ब्रिटिशांसाठी महत्वाचे क्षेत्र होते.
हैदराबादच्या टांकसाळीच्या नाण्यांवर चिन्ह
कलकत्ता टांकसाळ ब्रिटिश राजवटीत सुरु झाली होती.1859 साली या टांकसाळीत प्रथमच नाणी तयार करण्यात आली. मात्र, त्यावेळी बनवलेली नाणी ब्रिटिश सरकारने काढून घेतली. तर हैदराबादच्या टांकसाळीच्या नाण्यांवर तारखेच्या खाली तारेचे चिन्ह आहे. काही प्रकरणांमध्ये डॉट डायमंड आकार चिन्ह देखील आहे. नाण्यावर लिहिलेल्या तारखेच्या खाली असलेला हिरा आणि मधोमध असलेला ठिपकाही हैदराबाद टांकसाळीचा आहे. येथे बनवलेल्या नाण्यांवर हिऱ्याच्या आकाराचे ठिपके आहेत. हे नाण्यावर चिन्हांकित केलेल्या उत्पादनाच्या वर्षाच्या खाली स्थित आहे.
महत्वाच्या बातम्या:
EV Scooter: ऐकावं ते नवलंच! पठ्ठ्याने 10 रुपयांच्या नाण्यांनी खरेदी केली स्वप्नातली बाईक, कंपनीच्या CEO ची सोशल मीडीयावर पोस्ट