(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bank Holidays in June 2022 : जून महिन्यात आठ दिवस बँका राहणार बंद! ही आहे सुट्ट्यांची यादी
Bank Holidays in June 2022 : जून महिन्यात आठ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत.
Bank Holidays in June 2022 : मे महिना संपून लवकरच जून महिना सुरु होणार आहे. अशा वेळी, तुमची बॅंकेत काही महत्वाची कामे असतील तर आताच उरकून घ्या. कारण जून महिन्यात आठ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार जून महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडर यादीनुसार बँका दोन दिवस बंद राहतील. तर, इतर दिवस वीकेंडचे आहेत. तसेच, काही राज्यांमध्ये बँका सर्व सणांसाठी बंद राहणार नाहीत.
जून 2022 मधील बँक सुट्ट्यांची यादी :
2 जून : महाराणा प्रताप जयंती/ तेलंगना स्थापना दिवस - हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, तेलंगना
5 जून (रविवार) : सार्वजनिक सुट्टी
11 जून (शनिवार) : सार्वजनिक सुट्टी
12 जून (रविवार) : सार्वजनिक सुट्टी
15 जून : गुरु हरगोविंद जी यांचा जन्मदिवस - उडीसा, मिझोरम, जम्मू-काश्मीर
19 जून (रविवार) : सार्वजनिक सुट्टी
25 जून (शनिवार) : सार्वजनिक सुट्टी
26 जून (रविवार) : सार्वजनिक सुट्टी
वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करू शकाल. लाँग वीकेंडसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करू शकता.
महत्वाच्या बातम्या :