एक्स्प्लोर

Job News : नोकरीत तरुण नाखुश! 54 लाख पगार असणाऱ्या नोकरीवर सोडलं पाणी, पुढे घेतला 'हा' निर्णय

Job News : नोकरीत नाखुश असलेल्या तरुणानं 54 लाख पगार असणाऱ्या नोकरीवर पाणी सोडलं आहे.

Job News : नोकरीला (Job) लागलेल्या सर्वाचं स्वप्न असतं की आपला पगार (Salary) हा लाखात असावा. यासाठी अनेक लोक खूप मेहनत घेतात, पण जेव्हा एखादा माणूस आपला छंद पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये पगाराची नोकरी सोडतो तेव्हा काय होते. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. तर काही लोक याला मूर्खपणा म्हणतील. पण असाच एक प्रकार बंगळुरूच्या प्रताप चौधरी यांनी केलाय. त्यांनी तब्बल 54 लाख रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडलं आहे. 

नोकरीवर तो खूश नव्हता

प्रताप चौधरी हे बंगळुरुच्या कंपनी स्क्वेअर यार्ड्समध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत होते. त्यांचा वार्षिक पगार 54 लाख रुपये होता, पण या नोकरीवर ते खूश नव्हते. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. बऱ्याचदा लोकांना असे वाटते की चांगले उत्पन्न हे चांगल्या नोकरीचे वैशिष्ट्य आहे. पश्चिम बंगालमधील रहिवासी असलेल्या प्रताप चौधरी यांनी वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी हे स्थान मिळवले, जे साध्य करण्यासाठी लोकांना अनेक वर्षे लागतात. 

5000 हून अधिक लोकांना प्रशिक्षण 

बायजू आणि स्क्वेअर यार्ड्स सारख्या कंपन्यांमधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. या मोठ्या स्टार्टअप्समध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कंपन्यांमध्ये त्याने शेकडो लोकांचे नेतृत्व केले आणि 5000 हून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले. त्यांचे वार्षिक उत्पन्न 54 लाख रुपये होते. एवढी कमाई करूनही परनाताप चौधरी आपल्या कामावर खूश नव्हते आणि त्यांना नेहमी काहीतरी नवीन काम करायचे होते.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडली नोकरी 

चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने पूर्णवेळ नोकरी सोडून आपला छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. त्याला लिंक्डइनवर बरेच दिवस लिहायचे होते आणि त्याला स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करायचा होता. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, मी सहा महिन्यांपूर्वी या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून मी दूरस्थ आणि डिजिटल व्यवसाय तयार करू शकेन. यासोबतच मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकतो, जो मी पूर्वी करू शकत नव्हतो.

प्रियजनांसोबत वेळ घालवणे अधिक महत्त्वाचे 

चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आठवड्यातून 70 तासांपेक्षा जास्त काम करायचे. त्यामुळे ते कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवू शकत नव्हते. रविवारची सुट्टी कुटुंबासोबत साजरी करण्याएवढा वेळही त्यांच्याकडे नव्हता. गेल्या 90 दिवसांत मला माझ्या नोकरीत सुमारे 10 लाख रुपये मिळाले असते. परंतु या तीन महिन्यांत पहिल्यांदाच मी माझे आयुष्य व्यवस्थित जगलो आहे. जे मी गेल्या तीन वर्षांत करू शकलो नाही.

LinkedIn वर लिहिण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण

लिंक्डइनवर लिहिण्याचे त्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, गेल्या 90 दिवसांपासून ते या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकले. त्यामुळे लिंक्डइनवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. या कामासाठी त्यांना पूर्वीच्या तुलनेत केवळ 10 टक्केच पैसे मिळत असले तरी आता त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कामामुळे ते खूश आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Bank Job : मोठी बातमी! कोट्यावधी युवकांना बँकेत मिळणार नोकरी, पगार किती? कसा कराल अर्ज? सविस्तर माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : माझी बॅग तुला तपासायला देतो फक्त कपडे चोरु नकोAmol Kolhe on Ajit Pawar : चुकीला क्षमा पण गद्दारीला माफी नाही, अमोल कोल्हे अजितदादांवर बरसलेSanjay Raut Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, मनसैनिकांनी दिलं आमंत्रणPratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
Embed widget