एक्स्प्लोर

पहिल्या तिमाहीत घरांच्या विक्रीत मोठी वाढ, 1 कोटीपेक्षा जास्त किंमतीच्या घर विक्रीत 51 टक्क्यांची वाढ

जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीत घरांच्या विक्रीत मोठी वाढ झालीय. विशेष म्हणजे जास्त किंमतीच्या घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Home Sales : घरांच्या किंमतीत (Home Sales Price) वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार पहिल्या तिमाहीत म्हणजे जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीत घरांच्या विक्रीत मोठी वाढ झालीय. विशेष म्हणजे जास्त किंमतीच्या घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 1 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या घरांच्या विक्रीत 51 टक्क्यांची वाढ झालीय. तर 50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या घरांच्या विक्रीत घट झाल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे. जाणून घेऊयात घर विक्रीच्या संदर्भातील सविस्तर माहिती. 

सहा वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च घरांची विक्री 

नाइट फ्रँकच्या अहवालानुसार पहिल्या तिमाहीत घरांच्या विक्रीत 9 टक्क्यांची वाढ झालीय. जानेवारी ते मार्च दरम्यान 86,345 घरांची विक्री झाली आहे. ही विक्री गेल्या सहा वर्षातील कोणत्याही तिमाहीतील दुसऱ्या क्रमांकाची विक्री आहे. याआधी ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिमाहीत सर्वोच्च घरांची विक्री झाली होती.  

घरांची विक्री होण्यात कोणतं शहर आघाडीवर? 

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या आठ शहरांमध्येच 86,345 घरांची विक्री झालीय. त्यापैकी, 23,743 घरांची विक्री एकट्या मुंबईत झालीय. ही विक्री मागील वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी अधिक आहे. म्हणजे घर विक्रीच्या बाबतीत मुंबई शहर सर्व शहरांपेक्षा आघाडीवर आहे. दरम्यान, आठ शहरांमध्ये विक्री झालेल्या 86,345 घरांपैकी 40 टक्के घरं ही 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची आहेत. विक्री झालेल्या एकूण घरांपैकी 34,895 घरांची किंमत ही 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती असं अहवालात सांगण्यात आलं आहे. मात्र, दुसरीकडे 50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या घरांच्या विक्रीत 10 टक्क्यांची घट झालीय. घरांच्या वाढत्या किंमती आणि महागडी कर्ज यामुळं 50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या घरांच्या विक्रीत घट झालीय. 

कोणत्या शहरात सर्वात महागडी घरं?

जानेवारी 2024 ते मार्च 2024 या तिमाहीत घरांच्या विक्रीत मुंबई आघाडीवर आहे. मात्र, घरांच्या सर्वाधिक किंमती कोणत्या शहरात आहेत हे तुम्हाला माहितेय का? तर हैदराबाद या शहरात घरांच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. मागील वर्षीच्या तुलनेत हैदराबादमध्ये घरांच्या किंमतीत 13 टक्यांची वाढ झालीय. 

कोणत्या शहरात कित्ती टक्क्यांनी महाग झाली घरं?

मुंबई -   6 टक्क्यांची वाढ
बंगळुरु - 9 टक्क्यांची वाढ
एनसीआर -  5 टक्क्यांची वाढ
कोलकाता - 7 टक्क्यांची वाढ
पुणे  -          4 टक्क्यांची वाढ
 चेन्नई -        5 टक्क्यांची वाढ   

महत्वाच्या बातम्या:

Isha Ambani : अंबानींकडून मोठा सौदा! ईशा अंबानीने 500 कोटींमध्ये विकलं आपलं घर; 'या' हॉलिवूड स्टारने घेतलं विकत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

2014 पासून आत्तापर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
2014 पासून आत्तापर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
गॅस पेट्रोल ते CNG, फक्त 15 दिवसातच सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका, कोणत्या वस्तूत किती झाली वाढ?
गॅस पेट्रोल ते CNG, फक्त 15 दिवसातच सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका, कोणत्या वस्तूत किती झाली वाढ?
Maharashtra News LIVE Updates: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi : प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
Beed Land Scam : बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Embed widget