(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिलासादायक बातमी! 'या' क्षेत्रात होणार महाभरती, 50,000 हून अधिक लोकांना मिळणार रोजगार
बेरोजगार तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आयटी हार्डवेअरमध्ये (IT Hardware) नोकरभरती होणार आहे.
Job : बेरोजगार तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आयटी हार्डवेअरमध्ये (IT Hardware) नोकरभरती होणार आहे. आयटी हार्डवेअर क्षेत्रात लवकरच 50,000 हून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज डेल, एचपी, लेनोवो, फॉक्सकॉन इत्यादी 27 कंपन्यांना सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेसाठी मंजुरी मिळाली आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. PLI IT हार्डवेअर योजनेद्वारे एकूण 27 कंपन्यांना मंजुरी मिळाली असल्याचे ते म्हणाले.
23 कंपन्यानी सुरु केलं उत्पादन
बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अश्विनी वैष्णव यांनी असेही सांगितले की, पीएलआय योजनेंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास 95 टक्के कंपन्या पहिल्या दिवसापासून उत्पादन सुरू करणार आहेत. अशा स्थितीत 23 कंपन्या हे काम लवकरात लवकर करतील. उर्वरित चार कंपन्या येत्या 90 दिवसात या योजनेअंतर्गत उत्पादन सुरु करतील.
50000 हून अधिक नवीन रोजगार निर्माण होणार
आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार 27 कंपन्या आयटी हार्डवेअर योजनेद्वारे 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक आयटी हार्डवेअरमध्ये करतील. या गुंतवणुकीतून एकूण 50000 लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. एकूण 1.50 लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणे अपेक्षित असल्याचे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. आयटी हार्डवेअर योजनेंतर्गत ज्या कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे, त्यात डेल, फॉक्सकॉन, लेनोवो, फ्लेक्सट्रॉनिक्स, पेजेट, सोजो, व्हीव्हीडीएन, सिरमा, भगवती, पेजेट, सोजो, निओलिंक या कंपन्यांचा समावेश आहे.
नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी 17,000 कोटी रुपये खर्च होणार
देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उत्पादन-लिंक्ड प्रोत्साहन योजना 2.0 सुरू केली आहे. याद्वारे, सरकार देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याद्वारे या क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी 17,000 कोटी रुपये खर्च करेल.
महत्त्वाच्या बातम्या: