(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SIP : 'या' फंडात एकाच वेळी लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपमध्ये एसआयपीसह पैसे गुंतवणे शक्य
या ऑफरमध्ये गुंतवणूकदारांना किमान पाच हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत.
SBI SIP : एसबीआय म्युच्युअल फंडने (SBI MF) एक नवीन फंड ऑफर (NFO) लाँच केली आहे. या ऑफरनुसार तुम्ही एकाच वेळी लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप मध्ये एसआयपीसह पैसे गुंतवू शकणार आहात. हा एसबीआय मल्टीकॅप फंड ओपन एंडेड इक्विटी फंड पुढच्या आठवड्यात सोमवारी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुंतवणूकदार या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 28 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
या ऑफरमध्ये गुंतवणूकदारांना किमान पाच हजार रुपये गुंतवावे लागतील. या निधीचे व्यवस्थापन आर श्रीनिवासन आणि मोहित जैन करणार आहेत. मल्टीकॅप फंडांद्वारे, गुंतवणूकदारांना 15 क्षेत्रातील मोठ्या, मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये एक्सपोजर मिळेल. यामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी (SIP) सुविधाही उपलब्ध आहे.
एसबीआय मल्टीकॅप फंड NFO ची प्रमुख वैशिष्ट्ये
- हा एनएफओ ओपन एंडेड इक्विटी फंड आहे.
- हा फंड पुढील आठवड्यात 14 फेब्रुवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि गुंतवणूकदार या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यात पैसे गुंतवू शकतो.
- यामध्ये किमान ५ हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत.
- एक्झिट लोडबद्दल बोलायचे झाले तर, एका वर्ष होण्याआधी पैसे काढल्यास एक टक्के शुल्क भरावे लागेल.
- तुम्ही या फंडात एसआयपीद्वारे देखील गुंतवणूक करू शकता म्हणजेच ठराविक रक्कम या योजनेत नियमित वेळेच्या अंतराने गुंतवली जाऊ शकते.
मल्टी कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करता तेव्हा त्याचे पैसे फक्त लार्ज कॅप कंपन्यांमध्ये, मिड कॅप फंड मिड कॅप कंपन्यांमध्ये आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवले जातात. दुसरीकडे, नावाप्रमाणे, मल्टी कॅप म्युच्युअल फंडाचे पैसे लार्ज कॅप, स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. यामध्ये गुंतवणुकीचा फायदा असा आहे की फंड व्यवस्थापकावर कोणतीही बंधने नाहीत आणि ते परतावा वाढवण्यासाठी चांगली पावले उचलू शकतात. यात तीन प्रकार आहेत, एक ज्यामध्ये सर्वात जास्त फोकस लार्ज कॅप स्टॉकवर आहे, दुसरा ज्यामध्ये मिड कॅप स्टॉक्सवर फोकस आहे आणि तिसरा फोकस स्मॉल कॅप स्टॉक्सवर आहे.
हे ही वाचा -
- Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी कायम; Sensex 657 तर Nifty 197 अंकांनी वधारला
- तुमच्याकडे विमा पॉलिसी असेल तर शेअर्स स्वस्त मिळणार
- LIC IPO; सरकार 5 टक्के हिस्सा 75 हजार कोटींना विकणार? अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha