IT comapny Job : CV ठेवा तयार, IT क्षेत्रात फ्रेशर्संना मोठी संधी, पगारही चांगला मिळणार
बऱ्याच कालावधीनंतर आयटी क्षेत्राला (IT comapny) पुन्हा चांगले दिवस आले आहेत. ऐकेकाळी लाखो लोकांना कामावरून काढून टाकल्यानंतर, आयटी कंपन्या आता कामगारांना नव्याने कामावर घेण्याच्या तयारीत आहेत.
IT comapny Job : बऱ्याच कालावधीनंतर आयटी क्षेत्राला (IT comapny) पुन्हा चांगले दिवस आले आहेत. ऐकेकाळी लाखो लोकांना कामावरून काढून टाकल्यानंतर, आयटी कंपन्या आता कामगारांना नव्याने कामावर घेण्याच्या तयारीत आहेत. यावर्षी फ्रेशर्सना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की यावर्षी फ्रेशर्सच्या भरतीत सुमारे 25 टक्के वाढ होईल. मात्र, यावेळी कंपन्या काही खास कौशल्यांसह तरुणांवर नजर ठेवतील.
AI, ML आणि डेटा सायन्सचे ज्ञान असलेल्या लोकांवर लक्ष
अहवालानुसार, आयटी क्षेत्राने पुन्हा एकदा तरुणांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स देखील त्यांची नियुक्ती प्रक्रिया सुमारे 40 टक्क्यांनी वाढवणार आहेत. या वर्षी कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स यासारख्या गोष्टींचे ज्ञान असलेल्यांवर अधिक लक्ष केंद्रित करतील. यामध्ये अनुभवी लोकांनाही संधी दिली जाणार आहे. कंपन्यांमध्ये डेटा मॅनेजमेंटच्या कामाची मागणी वाढत आहे. याशिवाय पायथन प्रोग्रॅमिंग, एथिकल हॅकिंग, AWS सिक्युरिटी आणि जावा स्क्रिप्ट यासारख्या गोष्टींनाही मागणी आहे.
एक्सेंचर, टीसीएस आणि एचसीएल टेक या कंपन्यांनी केलं धोरण तयार
उद्योग क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अशा स्थितीत बाजाराचा विचार करता कंपन्यांमध्ये एआय आणि क्लाउड कॉम्प्युटिंगसारख्या गोष्टींची मागणी वाढली आहे. कौशल्य कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणे आता कंपन्यांसाठी सक्ती बनले आहे. Accenture, TCS (Tata Consultancy Services) आणि HCL Tech सारख्या कंपन्याही त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. तसेच, नवीन भरतीमध्ये, ते अशा लोकांचा शोध घेत आहेत ज्यांच्याकडे ही कौशल्ये आहेत.
विशेष कौशल्य असलेल्या तरुणांनाही मिळणार चांगला पगार
TCS ने आधीच माहिती दिली होती की यावेळी ते कंपनीत जवळपास दुप्पट लोकांना संधी देणार आहेत. एचसीएल टेकने म्हटले आहे की, यावेळी नियुक्ती करताना त्यांचे विशेष कौशल्यांवर असेल. कंपनीत येणाऱ्या तरुणांनी प्रकल्पाची जबाबदारी घेण्यास तयार व्हावे, अशी आमची इच्छा आहे. विशेष कौशल्य असलेल्या तरुणांना चांगला पगार मिळणार असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यावर्षी चांगले कौशल्य असणाऱ्या तरुणांची कंपनीला मोठी गरज भासणार आहे. त्यामुळं कपन्या मोठ्या प्रमाणात भरती करण्याची शक्यता वर्तवली जातेय.
महत्वाच्या बातम्या: