Tata Technologies IPO: तारीख ठरली! गुंतवणूकदारांची प्रतिक्षा संपली, पुढच्या आठवड्यात उघडणार TATA समूहाचा 'हा' IPO
Tata Technologies IPO: तुम्ही Tata Technologies IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला त्याच्या तपशीलांची माहिती देत आहोत.
Tata Technologies IPO: तब्बल 20 वर्षांनंतर टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ (Tata Group IPO) येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tata Technologies चा IPO 22 नोव्हेंबर 2024 रोजी उघडत आहे. तर गुंतवणूकदार 24 नोव्हेंबर 2024 पर्यंत सब्सक्राइब करू शकता. बाजारातील गुंतवणूकदार गेल्या अनेक दिवसांपासून टाटा समूहाच्या IPO ची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीज (Tata Technologies) ही टाटा मोटर्सची सब्सिडियरी कंपनी आहे आणि या IPO द्वारे समूहानं तिला स्वतंत्र कंपनी म्हणून लिस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही देखील या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला या IPO (Tata Technologies IPO) च्या तपशीलांची माहिती देत आहोत.
Tata Technologies IPO बाबत सर्वकाही
Tata Technologies चा हा IPO (Tata Technologies IPO Details) पूर्णपणे ऑफर फॉर सेलद्वारे (Offer For Sale) येत आहे. म्हणजेच, टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड-1 आणि अल्फा टीसी होल्डिंग या इश्यूद्वारे त्यांचे स्टेक विकणार आहेत. या IPO द्वारे एकूण 60,850,278 इक्विटी शेअर्स विकले जाणार आहेत. यापैकी 46,275,000 इक्विटी शेअर्स टाटा टेक्नॉलॉजीचे, 9,716,853 इक्विटी शेअर्स अल्फा टीसी होल्डिंग आणि 4,858,425 इक्विटी शेअर्स टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 1 द्वारे विकले जाणार आहेत. ही सर्व माहिती कंपनीनं आपल्या फायलिंगमध्ये शेअर केली आहे. विशेष म्हणजे, कंपनीनं 9 मार्च 2023 रोजी IPO दाखल केला होता.
कंपनी काय करते?
टाटा टेक ही टाटा मोटर्सची सब्सिडियरी कंपनी आहे. ही कंपनी अभियांत्रिकी सेवा तसेच तंत्रज्ञानावर आधारित सुविधा पुरवते. ही कंपनी एरोस्पेस, यंत्रसामग्री आणि वाहतुकीसाठी सेवा पुरवते. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर 2023 च्या आर्थिक वर्षात कंपनीची कमाई 25 टक्क्यांनी वाढून 4,418 कोटी रुपये झाली आहे. कंपनीचा नफा 708 कोटी रुपये होता, ज्यामध्ये सुमारे 63 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
20 वर्षांची प्रतीक्षा संपणार
टाटा टेक्नॉलॉजीज (TATA Technologies) च्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी टाटा समूह मॉर्गन स्टॅनले इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ब्लॅकरॉक आणि काही अमेरिकन हेज फंडांशी बोलणी करत असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. ब्लॅकरॉक आणि मॉर्गन स्टॅनली यांच्यासोबतच टाटा टेक आपल्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकन मालमत्ता व्यवस्थापक घिसल्लो कॅपिटल, ओकट्री कॅपिटल आणि की स्क्वेअर कॅपिटल यांच्याही संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
टाटा टेक्नॉलॉजीज (TATA Technologies) चा आयपीओ (IPO) 22 नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. म्हणजेच, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात टाटा टेक्नॉलॉजीज (TATA Technologies) चा आयपीओ (IPO) उघडणार आहे.