Ruchi Soya : रुची सोयाचे नाव होणार पतंजली फूड्स, कंपनीच्या संचालक मंडळाने दिली मंजुरी, शेअरमध्ये मोठी उसळी
Ruchi Soya : रुची सोयाचे नाव बदलून पतंजली फूड्स असे होणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने याला मंजुरी दिली आहे.
Patanjali FPO : रामदेव बाबा यांच्या कंपनी रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडचे नाव लवकरच बदलणार आहे. रुची सोयाच्या संचालक मंडळाने रुची सोया इंडस्ट्रीजचे नाव बदलून पतंजली फूड्स लिमिटेड असे करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने यासाठी स्टॉक एक्स्चेंजकडे अर्ज दाखल केला असून संचालक मंडळाच्या निर्णयाची माहिती दिली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 10 एप्रिल रोजी झाली. या बैठकीत पतंजली आयुर्वेदच्या फूड पोर्टफोलिओशी ताळमेळ वाढवण्याच्या सर्वात कार्यक्षम मार्गाचे मूल्यमापन करण्यासाठी संचालकांनी तत्वतः मान्यता दिली आहे. रुची सोयाने कंपनीच्या अधिकार्यांना प्रस्तावित व्यवहाराच्या अटी व शर्तींची वाटाघाटी, अंतिम रूप देणे, अंमलात आणणे आणि वितरित करण्याचे अधिकार दिले आहेत.
रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडचे नाव दलणार असल्याची बातमी समोर आल्यापासून रुची सोयाच्या स्टॉकमध्ये मोठी वाढ होत आहे. रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 5.24 टक्क्यांच्या वाढीसह 972 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. आज सकाळी हा शेअर ट्रेडिंगच्या सुरुवातीला 969 रुपयांवर उघडला आणि 999.45 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर गेला. महत्वाची बाब म्हणजे रुची सोयाने 650 रुपयांच्या किमतीत FPO (फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग) आणले होते. त्या पातळीवर रुची सोयाच्या स्टॉकने त्यांच्या गुंतवणूकदारांना 49 टक्के परतावा दिला आहे.
(टीप : येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने दिली जात आहे. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ABPLive.com वरून येथे कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जात नाही.)
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या: