Mamaearth IPO : गुंतवणूकदारांच्या कामाची बातमी! दिवाळीपूर्वी बाजारात येणार मामाअर्थचा आयपीओ; मालामाल होण्याची संधी
Mamaearth Parent Honasa To Launch IPO : मामाअर्थ (Mamaearth) ची मालक कंपनी होनासा 31 ऑक्टोबरपर्यंत शेअर बाजारात आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.
Honasa Consumer IPO : सौंदर्य आणि पर्सनल केअर उत्पादने बनवणाऱ्या मामाअर्थ (Mamaearth) ची मालकी कंपनी होनासा (Honasa) आयपीओ (IPO) लवकरच शेअर बाजारात (Share Market) येऊ शकतो. शार्कटँक इंडिया (Shark Tank India) शोमध्ये परिक्षक म्हणून झळकलेल्या गझल अलघ (Ghazal Alagh) चा मामाअर्थ (Mamaearth) हा चाइल्डकेअर ब्रँड आहे. सध्या मामाअर्थ कंपनीच्या आयपीओ (IPO) ची तयारी जोरात सुरू आहे. चाइल्डकेअर ब्रँड मामाअर्थ कंपनी स्टार्टअप जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी
शार्क टँक इंडिया या रिअॅलिटी शोमध्ये गझल अलग ही जज बनल्याने या ब्रँडला जास्त प्रसिद्धी मिळाली आणि आवाकाही वाढला. आता गझल अलघ मामाअर्थ कंपनी आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत आहे. मामाअर्थ (Mamaearth) ब्रँडच्या मूळ कंपनीचे नाव होनासा कन्झुमर प्रायव्हेट लिमिटेड (Honasa Consumer Private Limited) आहे. यावर्षी दिवाळीपूर्वी मामाअर्थ कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात येऊ शकतो. मामाअर्थ (Mamaearth) ची मालक कंपनी होनासा 31 ऑक्टोबरपर्यंत शेअर बाजारात आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.
दिवाळीपूर्वी बाजारात येणार मामाअर्थचा आयपीओ
होनासा कन्झुमर प्रायव्हेट लिमिटेड (Honasa Consumer Private Limited) कंपनी मामाअर्थ (Mamaearth), डर्मा को (The Derma Co), आणि बीब्लंट (BBlunt) सारख्या ब्रँडची मालकी कंपनी आहे. होनासा कंपनी 31 ऑक्टोबरपर्यंत शेअर बाजारात आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती उद्योगक्षेत्रातील सूत्रांच्या हवाल्याने मनीकंट्रोलने दिली आहे.
मालामाल होण्याची संधी
मीडिया रिपोर्टनुसार, मामाअर्थ (Mamaearth) कंपनीच्या आयपीओ (IPO) मध्ये कंपनीचे मूल्यांकन 1.2 अब्ज ते 1.4 अब्ज डॉलर्स म्हणजेच 10 ते 12 हजार कोटी रुपये असू शकते. मामाअर्थ (Mamaearth) ने यापूर्वी गेल्या वर्षी देखील आयपीओ लाँच करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी गझल अलघ 3 बिलियन डॉलरपेक्षा जास्त मूल्यांकनासाठी प्रयत्न केला होता. यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. सोशल मीडियावरही हे प्रकरण खूप चर्चेत होतं.
सेबीकडून सूचीसाठी नियामक मंजूरी
मामाअर्थची मूळ कंपनी होनासा कन्झुमर प्रायव्हेट लिमिटेड (Honasa Consumer Private Limited) ने जानेवारी 2022 मध्ये युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश केला. तेव्हा कंपनीचे मूल्य 1.2 अब्ज डॉलर होते. ब्युटी, बेबीकेअर आणि स्किनकेअर सेगमेंटमध्ये झपाट्याने वाढणारी D2C (डायरेक्ट-टू-ग्राहक) फर्म 2022 ची पहिली युनिकॉर्न होती. डिसेंबर 2022 मध्ये मसुदा कागदपत्रे भरल्यानंतर ऑगस्टमध्ये सेबीकडून कंपनीला सूचीसाठी नियामक मंजूरी मिळाली आहे.