LIC चा IPO चालू आर्थिक वर्षात येण्याची शक्यता कमी ?
LIC चा IPO चालू आर्थिक वर्षात येण्याची शक्यता कमी मात्र शेवटच्या तिमाहीत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
LIC IPO : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) चा IPO चालू आर्थिक वर्षात येण्याची शक्यता कमी आहे. कारण मूल्यांकनाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि त्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो अशी माहिती आयपीओच्या तयारीत गुंतलेल्या एका मर्चंट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यानंतरही आयपीओशी संबंधित अनेक नियामक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो.
DIPAM सचिव तुहिन कांत पांडे यांनी एक ट्विट करत एलआयसीच्या आयपीओसाठी तयारी सुरू आहे आणि ती 2021-22 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत लॉन्च केली जाईल असा दावा केला आहे. पांडे यांच्या म्हणण्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी तयारी केली आहे.
आयपीओला विलंब होण्याचे कारण ?
आयपीओ लाँच करण्यापूर्वी बाजार नियामक सेबीची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. याशिवाय विमा क्षेत्राची नियामक संस्था IRDAI कडूनही परवानगी घ्यावी लागेल. IRDAI प्रमुखाचे पद जवळपास सात महिन्यांपासून रिक्त आहे. अशा परिस्थितीत एलआयसीचा आयपीओ 2021-22 या आर्थिक वर्षात येण्याची शक्यता खूपच कमी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण हे आर्थिक वर्ष केवळ संपायला अवघे तीनच महिने उरले आहेत.
एलआयसीचे मूल्यांकन ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. याचे कारण म्हणजे LIC चा आकार खूप मोठा आहे आणि त्याची उत्पादन रचना देखील मिश्रित आहे. त्यात रिअल इस्टेट मालमत्ता आहे. त्यामुळे मूल्यांकनाचे काम पूर्ण होईपर्यंत शेअर विक्रीचा आकारही ठरवता येणार नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
हा IPO निर्गुंतवणुकीच्या लक्ष्यासाठी महत्त्वाचा
चालू आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. खरंतर या आर्थिक वर्षात 1.75 लाख कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट गाठण्यात हा IPO अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. याशिवाय, सरकारला बीपीसीएलच्या धोरणात्मक विक्रीकडूनही मोठ्या आशा आहेत. अलीकडेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, सरकार निर्गुंतवणुकीच्या दिशेने चांगली वाटचाल करत आहे. नोकरशाही आणि विविध विभागांच्या त्रुटी दूर करण्यासाठी वेळ लागतो, परंतु सरकार ते वेगाने करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीतारमन म्हणाल्या होत्या.
संबंधित बातम्या
Next week IPO : पुढच्या आठवड्यात पाच कंपन्यांच्या शेअर्सचं लिस्टिंग, आयपीओत दमदार कामगिरी, बाजारात होणार का कमाल?
IPO New Listings: पुढच्या आठवड्यात पाच कंपन्यांच्या शेअर्सचं लिस्टिंग; आयपीओत दमदार कामगिरी, बाजारात होणार का कमाल?
LICचे पॉलिसीधारक आहात, IPO साठी इच्छुक असाल तर 'हे' काम आधी करा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha