Bitcoin, Dogecoin, Ether यासह अनेक बड्या क्रिप्टोकरन्सीच्या किंमती पडल्या, जाणून घ्या आजच्या किंमती
Cryptocurrency: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत सातत्याने घट होताना दिसत आहे.
मुंबई : बिटकॉईन इथर, डॉजेकॉईन आणि शिबा इनू या बड्या क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency) किंमतीमध्ये आज घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. ताज्या माहितीनुसार, बिटकॉईनच्या किंमतीमध्ये 0.38 टक्क्यांची घसरण झाली आहे. जगातील सर्वात जुनी क्रिप्टोकरन्सी असलेले बिटकॉईन भारतीय एक्सचेन्ज CoinSwitch Kuber वर 33.9 लाख रुपयावर ट्रेड करत होते. CoinMarketCap आणि Binance यासारख्या आंतरराष्ट्रीय एक्सचेन्जवर बिटकॉईनची किंमत ही 31.2 लाख रुपये इतकी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग पाचव्या दिवशी 33.2 लाख रुपयांच्या खाली बिटकॉईनची किंमत आली आहे.
Bitcoin प्रमाणेच Ether या क्रिप्टोकरन्सी चांगला परफॉर्म करताना दिसत नाही. Gadgets 360 च्या क्रिप्टोकरन्सी प्राइस ट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार, इथर कॉईनच्या किंमतीमध्ये 2.39 टक्क्यांची घसरण झाली असून ती आता 2.5 लाख रुपयांवर पोहोचली आहे.
गेल्या आठवड्यात, 6 जानेवारीला अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार हे व्याजदर येत्या मार्च महिन्यापासून लागू होणार आहेत. या माहितीनंतर क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीमध्ये सातत्याने घसरण होत असल्याचं दिसून येतंय. ही घोषणा झाल्यापासून आतापर्यंत बिटकॉईनच्या किंमतीत 9 टक्के तर इथरच्या किंमतीत 8.3 टक्क्यांची घसरण झाली आहे.
त्या आधीपासूनच म्हणजे ओमायक्रॉनचा धोका जगभरावर घोंगावताना क्रिप्टोकरन्सीच्या किंमती घसरायला सुरुवात झाल्या होत्या. त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.
सध्याचं क्रिप्टोमार्केट हे 1.7 ट्रिलियन डॉलर्स इतकं मोठं आहे. बिटकॉईन (Bitcoin) आणि इतर क्रिप्टोकरन्सीमुळे (Cryptocurrency) येणाऱ्या काळात आर्थिक संकट येऊ शकतं अशी भीती बँक ऑफ इंग्लंडने या आधीच व्यक्त केली होती. येत्या काळात बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या किंमती घसरतील आणि त्याचा परिणाम जागतिक आर्थिक संकटाच्या स्वरुपात होईल. ज्या संस्थांनी बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांच्याबाबतीत आताच काही अंदाज वर्तवण्यात येणार नाही पण याचा सर्वाधिक तोटा हा वैयक्तिक गुंतवणूकदारांना होणार आहे. असं बँकेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या :