(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPO : बाजारातल्या गोंधळामुळे सॉफ्टबँक-गुंतवणूक केलेली 'इनमोबी' आयपीओच्या पुनर्विचारात
बाजारपेठेतील टेक स्टॉक्समध्ये मोठ्या घसरणीमुळे सॉफ्टबँक-गुंतवणूक केलेल्या InMobi ला त्यांच्या आयपीओ योजनेचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे.
IPO : जागतिक बाजारपेठेतील टेक स्टॉक्समध्ये मोठ्या घसरणीमुळे सॉफ्टबँक-गुंतवणूक केलेल्या InMobi ला त्यांच्या आयपीओ (IPO) योजनेचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. अलीकडेच आलेल्या इतर नवीन ट्रेंडमधील टेक स्टॉकमध्ये मोठ्या सवलतीत ट्रेडिंग करणारा आयपीओ कंपनीला लॉन्च करायचा नाही अशी माहिती कंपनीच्या एका उच्च पदाधिकार्याने दिली आहे.
भारतातील पहिले युनिकॉर्न असलेली कंपनी मोबाइल जाहिरात सेवा प्रदान करते, ती कंपनी डिसेंबर 2021 च्या अखेरीस यूएस मार्केटमध्ये लिस्टेट होऊ शकते असं वृत्त गेल्या वर्षी मार्चमध्ये InMobi च्या बाबत प्रसिद्ध झालं होतं. कंपनी $12 ते 15 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनाने $1 अब्ज उभारण्याचा विचार करत असल्याचा एक अहवाल देखील प्राप्त झाला होता.
परंतू गेल्या वर्षी इंटरनेटवर आधारित सर्व नवीन तंत्रज्ञान आणि नवीन युगाचे स्टॉक यूएस आणि भारतीय बाजारपेठेत यशस्वीरित्या सूचीबद्ध झाले. पण गेल्या काही महिन्यांत त्यांच्याबद्दलची भावना ढासळली आहे. त्यामुळे अलीकडे सूचीबद्ध झालेले सर्व टेक स्टॉक्स सवलतीच्या दरात व्यवहार करत आहेत. व्याजदरात झालेली वाढ आणि अशा शेअर्सचे महागडे मूल्यांकन यामुळे गुंतवणूकदार चिंतेत असल्याचे दिसते.
दरम्यान, आयपीओच्या नेमक्या वेळेवर भाष्य करणे माझ्यासाठी कठीण जाईल. गेल्या 3 महिन्यांपासून बाजार ज्या प्रकारे दबावाच्या काळात जात आहे. अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेणे फार कठीण आहे. अशा परिस्थितीत आम्ही योग्य वेळी आयपीओबाबत निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण कंपनीचे संस्थापक नवीन तिवारी यांनी दिलं आहे. गेल्या वर्षीच्या तेजीमध्ये कंपनीने लिस्टिंगची चांगली संधी गमावली का असे विचारले असता? तर, यावर उत्तर देताना नवीन तिवारी म्हणाले की, गेल्या वर्षी लिस्ट केलेले सर्व स्टॉक्स सध्या कुठे आहेत? यावर एक कटाक्ष टाकला असता, यापैकी बहुतेक त्यांच्या किंमतीपेक्षा 50 टक्क्यांहून अधिक कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपण सावध राहण्याची गरज आहे. खूप जास्त आणि कमी असलेला IPO आम्हाला नक्कीच नको आहे. कारण ही स्थिती तुम्ही स्वतःसाठी बाजारात पाहू इच्छित नाही.
हे ही वाचा -
- LIC IPO: एलआयसीचा आयपीओ हवा आहे? जाणून घ्या त्यासाठीच्या आवश्यक गोष्टी
- SIP साठी 5 स्टार रेटिंगच्या सर्वोत्कृष्ट 5 योजना, वार्षिक 33 % परतावा मिळू शकतो
- NSE CASE: चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून लुकआउट परिपत्रक जारी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha