एक्स्प्लोर

स्टॉक मार्केटमध्ये धमाका! या आठवड्यात पाच नवे आयपीओ येणार; पैशांचा पाऊस पडणार?

सध्या अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. या आठवड्यातही एकूण पाच नवे आयपीओ येणार आहेत. सोबतच अनेक कंपन्या या आठवड्यात शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहेत.

IPO Next Week: शेअर बाजारात या आठवड्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण सोमवारी बजाज हाउसिंग फायनान्स (Bajaj Housing Finance) हा शेअर स्टॉक मार्केटवर सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे. यासह या आठड्यात एकूण 14 आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार असून 5 नवे आपयीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. 
 
शुक्रवारी समाप्त झालेला याआधीच्या आठवड्यातही मोठ्या घडामोडी घडल्या. गेल्या आठवड्यात 5 मेनबोर्ड आणि 12 एसएमई आयपीओ आले होते. गाला प्रिसिजन इंजीनिअरिंग (Gala Precision Engineering) आणि श्री तिरूपती बालाजी (Shree Tirupati Balajee) या शेअर्सने शेअर बाजारावर जबरदस्त इन्ट्री केली. या आयपीओंमुळे गुंतवणूकदारांना चांगला नफा झाला. अशा स्थितीत या आठवड्यातही चांगली कमाई करण्याची संधी आहे. 

बजाज हाउसिंग फायनान्सने टाटा टेक्नोलॉजीसचा विक्रम मोडला 

बजाज हाउसिंग फायनान्स या आयपीओसाठी एकूण  89 लाख अर्ज आले. याआधी उसने टाटा टेक्नोलॉजीस (Tata Technologies) या आयपीओसाठी 73.5 लाख अर्ज आले होते. या आठवड्यात सर्वांत अगोदर आर्केड डेव्हलपर्स (Arkade Developers) आणि नॉर्थर्न आर्क कॅपिटल (Northern Arc Capital) हे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. सोबतच बजाज हाउसिंग फायनान्स, क्रॉस (Kross) आणि टॉलिन्स टायर्सचे (Tolins Tyres) शेअर्स सोमवारी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी सूचिबद्ध होतील. त्यानंतर पीएन गाडगीळ ज्वेलर्स या कंपनीचा शेअर मंगळवारी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी लिस्ट होणार आहे. वेस्टर्न कॅरियर्स (Western Carriers) या आयपीओत बुधवारी 18 सप्टेंबर पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. 

आर्केड डेव्हलपर्स आईपीओ (Arkade Developers IPO)

आर्केड डेव्हलपर्स हा एक मेनबोर्ड आयपीओ आहे. या आयपीओत 16 सप्टेंबरपासून 19 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 121 ते 128 रुपये आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 110 शेअर्स आहेत. म्हणजेच तुमच्याकडे या आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी 14,080 रुपये असणे गरजेचे आहे. या आयपीओतून कंपनी 410 कोटी रुपये उभे करणार आहे. हा आयपीओ 24 सप्टेंबर रोजी एनएसई आणि बीएसईवर लिस्ट होणार आहे. 

नॉर्थर्न आर्क कॅपिटल आईपीओ (Northern Arc Capital IPO)

नॉर्थर्न आर्क कॅपिटल या आयपीओत 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओच्या मदतीने ही कंपनी 777 कोटी रुपये उभे करणार आहे. या आपीओचा किंमत पट्टा 249 ते 263 रुपये आहे.  या आयपीओच्या एका लॉटमध्ये 57 शेअर्स असतील. नॉर्थर्न आर्क कॅपिटल हा आयपीओ 24 सप्टेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होणार आहे. 

या एसएमई आईपीओंची होणार लिस्टिंग 

एसएमई सेक्टरमध्ये या आठवड्यात एकूण 10 आयपीओ लिस्ट होणार आहेत. यात एक्सलंट वायर्स अँड पॅकेजिंग (Excellent Wires and Packaging), ट्रॅफिकोल आयटीएस टेक्नोलॉजीस (Trafiksol ITS Technologies), एसपीपी पॉलिमर्स (SPP Polymers), गजानंद इंटरनॅशनल (Gajanand International), शेयर समाधान (Share Samadhan), शुभश्री बायोफ्यूल्स एनर्जी (Shubhshree Biofuels Energy), आदित्य अल्ट्रा स्टील (Aditya Ultra Steel), व्हिजन इंफ्रा इक्विपमेंट सोल्यूशन्स (Vision Infra Equipment Solutions), माय मुद्रा फिनकॉर्प (My Mudra Fincorp) आणि सोधानी अकॅडमी ऑफ फिनटेक इनेबलर्स (Sodhani Academy of Fintech Enablers) यांचा समावेश आहे. 

5 नवे एसएमई आईपीओ येणार

या आठवड्यात पाच नवे एसएमई आयपीओ येणार आहेत. यामध्ये पॉप्यूलर फाउंडेशन (Popular Foundations), डेक्कन ट्रान्सकॉन लीजिंग (Deccan Transcon Leasing), एनव्हायरोटेक सिस्टम्स (Envirotech Systems) या आयपीओंचे सबक्रीप्शन बंद होणार आहेत. तर एसएमई मार्केटमध्ये या आठवड्यात एसडी रिटेल (SD Retail), बाइकवो ग्रीनटेक (BikeWo GreenTech), पॅरामाउंट स्पेशलिटी फोर्जिंग्स (Paramount Speciality Forgings), पेलाट्रो (Pelatro) आणि ओसेल डिव्हाईसेस (Osel Devices) हे नवे आयपीओ येणार आहेत. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

कधीकाळी पेपर टाकला, दूध विकलं, आज 400 कारचा मालक, स्वत:च्या हिमतीवर करोडपती झालेल्या 'बाबू'ची कहाणी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal speech Chakan: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांसमोर पहिलं भाषण, भुजबळ भरभरुन बोललेAashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलंChhagan Bhujbal Sharad Pawar : छगन भुजबळ-शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवासSuresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Eknath Shinde : मोठी बातमी, गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार,मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार : एकनाथ शिंदे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा 15000 रुपयांची एसआयपी केल्यास 1 कोटी किती वर्षात जमा होणार? जाणून घ्या
एसआयपीद्वारे 15000 रुपयांची म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास 1 कोटींची रक्कम किती वर्षात मिळेल, जाणून घ्या
Embed widget