या आठवड्यात येणार 'हे' चार मोठे आयपीओ; गुंतवणुकीसाठी पैसे ठेवा रेडी!
सध्या शेअर बाजारात मोठी उलाढाल होत आहे. या आठवड्यात एकूण 4 आयपीओ येणार आहेत. तुम्हाला या आयपीओंच्या माध्यमातून पैसे कमवण्याची चांगली संधी आहे.
मुंबई : सध्या भारतीय भांडवली बाजारात चांगलीच तेजी आहे. मुंबई शेअर बाजार अगदी 80 हजार अंक पार करण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय शेअर बाजारही चांगलाच वधारला आहे. सध्याची बाजाराची स्थिती पाहता अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनेक कंपन्या आपला आयपीओ घेऊन येत आहेत. या आठवड्यात गुंतवणूकदारांना एकूण चार आयपीओंमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. या आयपीओंच्या माध्यमातून तुम्हीही चांगले पैसे कमवू शकता.
1- Ambey Laboratories IPO
हा आयपीओ 4 जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. 8 जुलैपर्यंत तुम्हाला यात गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा किंमत पट्टा (प्राईस बँड) 65 रुपये ते 68 असा निश्चित करण्यात आला आहे. तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर एका वेळी तुम्हाला 2000 शेअर्स घ्यावे लागतील. ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ 46 रुपयांच्या प्रमियमवर आज उपलब्ध आहे.
2- गणेश ग्रीन भारत
हा आयपीओ 5 जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. 9 जुलैपर्यंत तुम्हाला यात गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा किंमत पट्टा 181 रुपये ते 190 रुपये आहे. तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला एका वेळी 600 शेअर्स घ्यावे लागतील. रविवारी ग्रे मार्केटमध्ये हा शेअर 220 रुपये होता.
3- Effwa Infra and Research
हा आयपीओ 5 जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला झालेला आहे. या आयपीओची साईज 51.27 कोटी रुपये आहे. 9 जुलैपर्यंत गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करता येईल. गुंतवणुकीसाठी 78 ते 82 रुपये प्रति शेअर असा किंमत पट्टा ठेवण्यात आला आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये या आयपीओचा शेअर 95 रुपये आहे.
4- सहज सोलर
हा आयपीओ येत्या 11 जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 15 जुलैपर्यंत तुम्हाला यात गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा किंमत पट्टा 171 रुपये ते 180 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आलाय. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर एकाच वेळी 800 शेअर्स खरेदी करावे लागतील. रविवारी ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ 100 रुपयांवर होता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
प्रतिमहिना जमा करा 3000 अन् मिळवा 10000000 रुपये; जाणून घ्या एसआयपीचा जबरदस्त फॉर्म्यूला!
'या' कंपनीने राहुल गांधींना केलं मालामाल, शेअर्सची संख्या 20 पटीने वाढली!