(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रतिमहिना जमा करा 3000 अन् मिळवा 10000000 रुपये; जाणून घ्या एसआयपीचा जबरदस्त फॉर्म्यूला!
एसआयपीच्या मदतीने तुम्ही प्रतिमहिना 3000 रुपयांची गुंतवणूक करून तब्बल 1 कोटी रुपये मिळवू शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणुकीची तयारी ठेवावी लागेल.
SIP Investment : सध्या शेअर बाजार (Share Market) चांगलाच तेजीत आहे. राष्ट्रीय (NSE) आणि मुंबई (BSE) शेअर बाजारातील या उसळीमध्ये गुंतवणूकदारही हात धुवून घेत आहेत. सध्याच्या काळात काही गुंतवणूकदार चांगले रिटर्न्स मिळवतायत. तर निर्देशांकाची सध्याची स्थिती पाहता यावेळी गुंतवणूक करणे योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, शेअर बाजारात तेजी असताना मुच्यूअल फंडामधील (Mutual Fund) गुंतवणुकीतही चांगली वाढ झाली आहे. लोक म्युच्यूअल फंडात मोठ्या संख्येने पैसे गुंतवत असून चक्रवाढ व्याजाची ताकद अनेकांना समजत आहे. याच पार्श्वभूमीवर तुम्ही फक्त 3000 रुपयांची एसआयपी करून तब्बल एक कोटी रुपये कसे मिळवू शकता, हे जाणून घेऊ या...
30 वर्षांत मिळवता येतील 30 कोटी रुपये
तुम्ही करत असलेल्या एसआयपीवर साधारण 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात, असे गृहित धरू. या हिशोबाने तुम्ही प्रतिमहा 3000 रुपयांची एसआयपी करून तब्बल 1 कोटी रुपये मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला सलग 30 वर्षे गुंतवणूक करावी लागे. सगल 30 वर्षे तुम्ही प्रतिमहिना 3000 रुपयांची एसआयपी केल्यास तुम्हाला 12 टक्के रिटर्न्सच्या हिशोबाने तब्बल 1,05,89,741 रुपये मिळतील. तुम्ही 30 वर्षांसाठी ही एसआयपी केल्यास तुम्ही या काळात एकूण 10,80,000 रुपयांची गुंतवणूक कराल. यामध्ये जमा रकमेवर तुम्हाला तब्बल 95,09,741 लाख रुपयांचे व्याज मिळेल.
स्टेप अप एसआयपीचा मोठा फायदा (What is Step up SIP)
तुम्हाला हे एक कोटी रुपये लवकर मिळवायचे असतील तर त्यासाठी स्टेप अप एसआयपी हा चांगला पर्याय आहे. तुम्ही जमा करत असलेल्या रकमेत दरवर्षी तुम्ही पाच टक्क्यांनी वाढ केली, तर तुमचे हे 1 कोटी रुपये मिळवण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होईल. तुम्ही एसआयपी करत असलेली रक्कम तुम्ही दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढवल्यास तुम्हाला 1 कोटी रिटर्न्स मिळव्यासाठी आणखी कमी काळ लागेल.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
'या' कंपनीने राहुल गांधींना केलं मालामाल, शेअर्सची संख्या 20 पटीने वाढली!
500 कोटींचा हिरेजडित नेकलेस, 54 कोटींची रिंग; निता अंबानींच्या जुन्या लुकची नव्याने चर्चा!
खिशात पैसे घेऊन राहा तयार! मुकेश अंबानी घेऊन येणार रेकॉर्डब्रेक IPO, खोऱ्याने पैसे ओढण्याची संधी