वयाच्या तिशीत 'या' पाच गोष्टी कधीची विसरू नका, अन्यथा भविष्यात होईल मोठी आर्थिक अडचण!
वयाच्या तिशीत असताना बहुसंख्या तरुण-तरुण नोकरीवर असतात. पण अर्थार्जन करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतात.
प्रत्येकाच्या आयुष्यातील 20 ते 30 हे वय फार महत्त्वाचे असते. याच काळात बहुसंख्य तरुण-तरूणी आपल्या करिअरला सुरुवात करतात. तुम्हीदेखील याच वयात असाल तर भविष्यातील घटनाक्रम लक्षात घेऊ काही काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही वयाच्या तिशीत अशाल तर त्यासाठी तुम्ही आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे गरजेचे आहे. याच काळात तुम्ही मुलांचे शिक्षण, लग्न यापासून ते निवृत्तीनंतरच्या काळासाठी लागणाऱ्या पैशांचा विचार करणए गरजेचे आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर वयाच्या तिशीत आर्थिक दृष्टीकोनातून नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? हे जाणून घेऊ या...
1- आरोग्य आणि जीवन विमान घेणे गरजेचे
अचानकपणे एखादा गंभीर आजार जडला तर तुम्ही आतापर्यंत जमवलेले सर्व पैसे एका झटक्यात संपून जाऊ शकतात. त्यामुळे 30 वर्षांचे होईपर्यंत तुमच्याकडे एक चांगला आरोग्यविमा असणे गरजेचे आहे. सोबतच तुमचे दुर्दैवाने आकस्मिक निधन झाल्यास तुमच्या कुटुंबाची आर्थिक अडचण होऊ नये यासाठी तुम्ही एक चांगला जीवन विमा घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वयाच्या तिशीत आरोग्य आणि जीवन विमा जरूर घ्या...
2- घर-गाडी घेण्याचं प्लॅनिंग चालू करा
नोकरी लागल्यानंतर जवळजवळ प्रत्येकजण कार आणि एका चांगल्या घराचे स्वप्न बघतो. त्यामुळे तुम्ही 20 ते 30 या वयोगटात असाल तर आतापासूनच कार आणि घर घेण्यासाठी आर्थिक नियोजनास सुरुवात करा. आतापासूनच सेव्हिंग करण्यास सुरुवात करा. तुमच्याकडे घर असेल तर आर्थिक दृष्टीकोनातून तुम्ही काही प्रमाणात स्थिरावता. त्यामुळे घराचा गांभीर्याने विचार करा.
3- अल्पकालीन बचत, गुंतवणूक करा
तुम्ही वयाच्या तिशीत असाल तर आतापासून अल्पबचतीला, गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी. या बचतीच्या माध्यमातून तुम्ही शॉर्ट टर्म गोल पूर्ण करू शकाल. या बचतीच्या माध्यमातून तुम्ही मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, घर खरेदी यासाठी पैसे उभे करू शकता. या वयात तुम्ही प्रत्येक कामासाठी छोट्या बचत योजनांचीही निवड करू शकता.
4- निवृत्तीसाठी आतापासूनच नियोजन करा
तसं पाहायचं झालं तर वयाच्या तिशीत असताना प्रत्येकजण पैसे खर्च करण्यावरच लक्ष देतो. मात्र तुमच्या निवृत्तीचे नियोजन करण्याचेही हेच योग्य वय आहे. निवृत्तीनंतर आर्थिक अडचण येऊ नये यासाठी तुम्ही एनपीएस यासारख्या योजनांत आतापासूनच गुंतवणूक करू शकता. .
5- इमर्जन्सी फंड तयार करा
वयाच्या तिशीत असताना जास्तीत जास्त लोक भविष्याचा विचार करत नाही. बहुसंख्य लोकांकडे इमर्जन्सी फंड नसतो. मात्र भविष्यात एखादीय वैद्यकीय अडचण आली, ऐनवळी नोकरी गेली तर मोठी आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असणे गरजेचे आहे. वयाच्या तिशीत तुम्ही या आप्तकालीन फंडाची तयारी करण्यासाठी विचार केला पाहिजे. आणीबाणीच्या काळात तुमच्या कुटुंबाला कमीत कमी 6 महिने कोणतीही अडचण येणार नाही, एवढा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असला पाहिजे.
हेही वाचा :
पीएम किसान योजनेच्या 6000 रुपयांसाठी अर्ज नेमका कसा करायचा? जाणून घ्या A टू Z माहिती
व्होडाफोन आयडियाचा नोकिया-सॅमसंगसोबत 3.6 अब्ज डॉलर्सचा करार; जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढलं!
कितीही प्रयत्न केला तरी आयपीओ अलॉट होत नाहीये? फक्त 'ही' एक ट्रिक वापरा, काम झालंच म्हणून समजा!