करोडपती व्हायचंय? फक्त 5000 रुपयांची गुंतवणूक करा, काही वर्षातच कोट्याधीश व्हा
तुम्हाला जर 20 -25 हजार रुपये पगार असेल तरीदेखील तुम्ही करोडपती होऊ शकता. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Investment Tips : अलीकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गुंतवणुकीचे विविध मार्ग आहेत. कमी काळात चांगला परतावा मिळणाऱ्या स्कीम आहेत. दरम्यान, तुम्हाला जर कमी पगार असेल आणि तुम्हाला करोडपती (millionaire) व्हायचं असेल तर ते शक्य आहे का? तर याच उत्तर शक्य आहे. तुम्हाला जर 20 -25 हजार रुपये पगार असेल तरीदेखील तुम्ही करोडपती होऊ शकता. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
जर तुम्ही योग्य नियोजन केले तर करोडपती होणं शक्य
तुम्हाला 20-25 हजार रुपयांच्या पगार असेल तर तुम्ही करोडपती होऊ शकता का? जर तुम्ही योग्य नियोजन केले तर करोडपती होणं शक्य आहे. तुम्ही दीर्घकाळ नियमित गुंतवणूक केली तर तुम्ही करोडपती होऊ शकता. समजा तुम्हाला एक कोटी रुपये जोडायचे आहेत. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याबाबतची माहिती पाहुयात. 1 कोटी सारखी मोठी रक्कम जमा करण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडात SIP हा एक चांगला मार्ग आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे, तुम्ही म्युच्युअल फंड स्कीममध्ये दर महिन्याला नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवता. जरी एसआयपीची रक्कम लहान असली तरीही चक्रवाढ आणि पैशाच्या खर्चाची सरासरी तुम्हाला दीर्घ कालावधीत मोठी रक्कम जोडण्याची परवानगी देते.
6000 ची SIP केल्यास करोडपती होण्साल किती वर्षे लागतील?
तुम्हाला जर पगार 20000 रुपये असेल तर त्यातील मोठा भाग म्हणजे 10 किंवा 15 हजार SIP मध्ये टाकणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. परंतु तुम्ही पगाराच्या 20-25 टक्के म्हणजे 4 ते 5 हजार रुपये सहज काढू शकता. तुम्ही एक छोटी गुंतवणूक करत आहात, त्यामुळे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक वेळ लागेल. जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात तुम्ही 5000 ची SIP केली. यामध्ये जर तुम्हाला 12 टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर तुम्हाला 1 कोटी रुपये जमा होण्यासाठी सुमारे 26 वर्षे लागतील. जर तुम्हाला 24 वर्षात 1 कोटी रुपये जोडायचे असतील तर तुम्हाला पगाराच्या 30 टक्के म्हणजे 6000 रुपये एसआयपी करावी लागेल.
जितकी जास्त गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुम्ही करोडपती व्हाल
तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुम्ही करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करु शकता. कमी पगाराच्या लोकांना एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणे शक्य नसते. अशा परिस्थितीत, तुम्ही एक पर्याय निवडून तुमची SIP स्मार्ट बनवू शकता. याद्वारे तुम्ही लवकरच लक्षाधीश होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करु शकता. अशा परिस्थितीत स्टेप-अप एसआयपी तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. तुमचा पगार वेळोवेळी वाढेल. त्यामुळं तुम्ही वेळेनुसार SIP ची रक्कम वाढवू शकता. जे तुमचे लक्षाधीश होण्याचे ध्येय साध्य करेल.
16 वर्षातही तुम्ही करोडपती होऊ शकता
जर तुम्ही एसआयपी 5000 रुपयांनी सुरू केली आणि वार्षिक 10 टक्के वाढ केली. म्हणजे दरवर्षी 10 टक्क्यांनी SIP ची रक्कम वाढवली, तर तुम्हाला अंदाजे 12 टक्के परतावा मिळेल. सुमारे एक कोटी रुपयांची भर पडेल. तुम्ही 10 ऐवजी 20 टक्के वार्षिक स्टेप-अप केल्यास, 1 कोटी रुपये जोडण्यासाठी लागणारा वेळ 16 वर्षांपर्यंत कमी होईल.
महत्वाच्या बातम्या: