नवीन वर्षाचा संकल्प करा, उद्यापासून 10 ते 20 रुपयांची बचत करा, काही वर्षातच कोट्याधीश व्हा
नवीन वर्षात तुम्ही पैशांची गुंतवणूक करण्याचा संकल्प केल्यास तुम्हाला भविष्यात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. थोडी थोडी बचत करुन तुम्ही कोट्याधीश होऊ शकता.
New Year New Idea: नवीन वर्ष 2025 सुरु होण्यास अवघा काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर 2025 हे नवीन वर्ष सुरु होणार आहे. या नवीन वर्षात अनेकजण अनेक संकल्प करत असतात. तुम्ही देखील काही ना काही संकल्प करणार असाल. पण नवीन वर्षात तुम्ही पैशांची गुंतवणूक करण्याचा संकल्प केल्यास तुम्हाला भविष्यात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. थोडी थोडी बचत करुन तुम्ही कोट्याधीश होऊ शकता.
प्रत्येकाला वाटचं की आपल्याकडं घर, गाडी, बंगला असावा. पण काही लोकांनाच हे शक्य होतं. काही लोक सध्या फारसे उत्पन्न नसल्यामुळे गुंतवणूक करु शकत नाहीत. पण 10-20 रुपये जमा करून तुम्ही मोठा निधी उभारू शकता, असे म्हटले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे सत्य आहे. आज करोडपती होणे सोपे आहे. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती हवी.
1) कोण बनू शकतो लक्षाधीश?
प्रत्येकजण करोडपती होऊ शकतो. लक्षाधीश होण्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करुनच तुम्ही तुमचे ध्येय साध्य करु शकता. गुंतवणूक सुरू करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नाही. तुम्ही थोड्या रकमेतून गुंतवणूक सुरु करू शकता. एखाद्याला फक्त योग्य दिशेने आणि दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल.
2) दररोज 10 ते 20 रुपये वाचवून तुम्ही करोडपती होऊ शकता का?
दररोज 10 ते 20 रुपये वाचवून तुम्ही देखील करोडपती होऊ शकतो. यासाठी केवळ दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही दररोज 10 रुपये वाचवले तर ते एका महिन्यात 300 रुपये होतात. म्युच्युअल फंडात एसआयपी करा. जर तुम्ही 35 वर्षांसाठी दर महिन्याला 300 रुपयांची SIP करत असाल आणि त्यावर 18 टक्के परतावा मिळत असेल, तर 35 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1.1 कोटी रुपयांचा परतावा मिळेल.
3) महिन्याला 20-25 हजार रुपये कमावणारा माणूस करोडपती होऊ शकतो का?
याचे उत्तर होय आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज नाही. तुम्ही प्रति महिना 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. आज प्रत्येकाला महिन्याला 1000 ते 2000 रुपयांची बचत करणे शक्य आहे. अशा परिस्थितीत, महिन्याला 20 ते 25 हजार रुपये कमावणारे लोक दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करुन सहजपणे करोडपती होऊ शकता. तुम्हाला फक्त दर महिन्याला एसआयपी सुरु ठेवायची आहे. त्यानंतर पगार वाढल्यावर गुंतवणूक वाढवायची आहे, सुरुवातीला तुमच्या उत्पन्नाच्या 10व्या भागाची गुंतवणूक करा.
4) लक्षाधीश होण्यासाठी कोणत्या वयात गुंतवणूक करायला हवी?
वेळ कोणाचीही वाट पाहत नाही. म्हणूनच तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितके ध्येय सोपे होईल. म्युच्युअल फंडातील एसआयपीद्वारे तुम्ही मोठी उद्दिष्टे साध्य करू शकता. जर 20 वर्षांचा युवक दररोज 30 रुपयांची एसआयपी करू शकतो, तर तो निवृत्तीच्या वेळी म्हणजे 60 वर्षानंतर 12 टक्के व्याजाने 1.07 कोटी रुपये जमा करू शकतो. या कालावधीत 4,32,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर परतावा 15% असेल तर तुम्हाला एकूण 2.82 कोटी रुपये मिळतील.
5) 40 वर्षाच्या पुढे वय असेल तर करोडपती कसे बनाल?
तुमचे वय 40 वर्षाच्या पुढे असेल तरीही तुम्ही करोडपती बवू शकता. वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत स्वतःसाठी 1 कोटी रुपयांचा निधी उभारू शकता, यासाठी तुम्हाला उर्वरित 20 वर्षे दरमहा थोडी अधिक गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही दर महिन्याला 10 हजार रुपयांची SIP करत असाल, तर वयाच्या 60 व्या वर्षी 12 टक्के रिटर्नच्या दराने तुम्हाला सुमारे 1 कोटी रुपये (99.91 लाख) मिळतील. जर 15% व्याज उपलब्ध असेल तर 1.5 कोटी रुपये देखील उभारता येतील.
6) 10 ते 15 वर्षात करोडपती कसे व्हाल?
10 ते 15 वर्षात करोडपती होण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला गुंतवणुकीचे पैसे वाढवावे लागतील. SIP कॅल्क्युलेटर नुसार, 15 वर्षात लक्षाधीश होण्यासाठी, तुम्हाला दरमहा किमान 15,000 रुपयांची SIP करावी लागेल आणि तुम्हाला त्यावर किमान 15 टक्के व्याज मिळावे. तथापि, 10 वर्षांत 1 कोटी रुपये उभे करण्यासाठी, एखाद्याला दरमहा किमान 35,000 रुपयांची एसआयपी करावी लागेल, जे थोडे कठीण आहे.