(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Investment Plan : 'या' योजनेत करा गुंतवणूक, 21व्या वर्षी मुलगा होईल 2 कोटींचा मालक
योग्य आर्थिक नियोजन केल्यास तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही. जर तुम्हालाही तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असेल. मग एक गुंतवणूक योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
Investment Plan : सर्वांनाच कायम सतावणारी एक गोष्ट म्हणजे भविष्य. सगळ्यांनाचं भविष्याची चिंता असते. मुलांच्या शिक्षणाची, त्यांच्या लग्नाची या सर्व गोष्टींची लोक काळजी करत असतात. भविष्यातील या गोष्टींची चिंता मिटवण्यासाठी तुम्हाला खूप आधीपासूनच आर्थिक नियोजन (Financial planning) करावं लागेल. योग्य आर्थिक नियोजन केल्यास तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही. जर तुम्हालाही तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असेल. मग एक गुंतवणूक योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. जितक्या लवकर तुम्ही हे सुरू कराल तितके तुमच्या मुलांच्या भवितव्याचे टेन्शन कमी होईल. तुमच्या मुलाला 2 कोटी रुपयांचा मालक कसा बनवायचा ते आम्ही तुम्हाला सांगतो.
मुलांच्या भविष्याची चिंता कोणाला नाही? जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आर्थिक नियोजन खूप आधीपासून सुरू करावे लागेल. एक अशी योजना आहे की, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुमच्या मुलाला वयाच्या 21 व्या वर्षी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये मिळू शकतात. जर तुम्ही नवविवाहित जोडपे असाल किंवा नुकतेच पालक झालेले असाल. मग तुम्ही ही गुंतवणूक योजना मुलाच्या जन्मापासून सुरू करू शकता. 21 व्या वर्षात तुम्हाला इतका परतावा मिळेल की मुलाकडे 2.1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल. चला तर मग हिशोब समजून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
दरमहा फक्त 10,000 रुपये जमा करा
तुमच्या मुलाकडे वयाच्या 21 व्या वर्षी 2 कोटींपेक्षा जास्त रक्कम असावी असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला दरमहा 10,000 रुपये SIP मध्ये गुंतवावे लागतील. याद्वारे तुम्ही 21 वर्षात मुलाच्या नावावर 25.20 लाख रुपये जमा करू शकाल. आता आपण असे गृहीत धरु की SIP वर तुम्हाला 16 टक्के परतावा मिळेल. त्यानंतर 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे 2.06 कोटी रुपये असतील. म्हणजे तुमच्या मुलाकडे वयाच्या 21 व्या वर्षी दोन कोटी रुपये असतील.
मुलाच्या नावावर 25.20 लाख रुपये जमा केल्यास 21 वर्षांत तुम्हाला 1.81 कोटी रुपये मिळतील. मुलाचे वय 21 वर्षे झाल्यानंतर, ही रक्कम मुलाचे शिक्षण, लग्न किंवा व्यवसायात गुंतवणुकीसाठी वापरली जाऊ शकते. तसे, आम्ही तुम्हाला सांगतो की ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट फंडाने 21 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे.
जर तुम्हाला फक्त 12 व्याज मिळाले तर
आपण असे गृहीत धरु की आपल्याला 16 टक्के व्याज मिळाले नाही आणि SIP मध्ये फक्त 12 व्याज मिळाले. तरीही तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा पश्चात्ताप करावा लागणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्या मुलाला 25.20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 88.66 लाख रुपयांचा परतावा मिळेल. त्याच्याकडे एकूण १.१३ कोटी रुपये असतील.
महत्त्वाच्या बातम्या: