एक्स्प्लोर

Adani Stocks : हिंडेनबर्ग रिसर्च बंद झालं, अदानींच्या शेअर मध्ये जोरदार तेजी, शेअर बाजारात काय घडतंय?

Hindenburg Research Adani Stocks : अदानी उद्योगसमुह ज्या संस्थेच्या अहवालामुळं अडचणीत आला होता त्या हिंडेनबर्ग रिसर्चनं कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे.

मुंबई : गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या उद्योगसमुहातील कंपन्या ज्या संस्थेच्या अहवालामुळं अडचणीत आल्या होत्या ती संस्था हिंडेनबर्ग रिसर्चनं (Hindenburg Research) त्यांचं कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे. नेट अँडरसननं सोशल मीडियावर पोस्ट करुन हिंडेनबर्ग रिसर्च बंद करत असल्याची घोषणा केली. त्यामुळं  आज शेअर बाजार सुरु झाला तेव्हा अदानी उद्योग समुहाच्या लिस्टेड कंपन्यांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. 

अदानी ग्रुपच्या शेअर बाजारात लिस्ट असलेल्या कंपन्यांपैकी अदानी पॉवरचा स्टॉक 7.8 टक्क्यांनी वाढला. अदानी ग्रीन एनर्जीचा स्टॉक 7.8 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी सोल्यूशन्स 5.18 टक्क्यांनी वाढला. एसीसी सिमेंट 3.47 टक्क्यांनी तर, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 5.78 टक्क्यांनी वाढले. अदानी पोर्टस अँड एसईझेड 4.29 टक्के, अदानी टोटल गॅस 5.21 टक्क्यांनी वाढले. अंबुजा सिमेंटचा शेअर 4.01 टक्क्यांनी  वाढले. संघी इंडस्ट्रीजचे शेअर 2.92 टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे अदानी विल्मरचे घसरले आहेत. 

हिंडेनबर्ग रिसर्चनं जानेवारी 2023 मध्ये अदानी ग्रुप विरोधात एक रिपोर्ट जारी करुन बाजारात फेरफार आणि  अकाऊंटिंग घोटाळ्याचा आरोप केला होता. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे स्टॉक्स कोसळले होते. अदानी ग्रुपचं मार्केट कॅपिटलायझेशन 20 लाख कोटींवरुन 7.50 लाख कोटींपर्यंत आलं होतं. 

हिंडेनबर्गनं 24 जानेवारीला अदानी ग्रुप विरोधातील पहिला रिपोर्ट जारी केला होता. त्या मध्ये अदानी ग्रुपवर स्टॉकच्या हेराफेरी आणि फसवणुकीचे आरोप लावण्यात आले होते. ते आरोप अदानी ग्रुपकडून फेटाळण्यात आले होते. 
 
हिंडेनबर्गनं 10 ऑगस्ट 2024 सेबी प्रमुख माधवी पुरी बुच विरोधात रिपोर्ट जारी केला होता. माधवी बुच आणि धवल बुच यांच्या कथित गुंतवणुकीमुळं सेबीनं अदानी रिपोर्टवर कारवाई केली नव्हती असा आरोप केला होता. मात्र, माधवी बुच यांनी ते आरोप फेटाळले होते. 

नेट अँडरसननं हिंडेनबर्ग रिसर्चनं त्यांच्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर एक्सवर संस्थापक नेट अँडरसननं वैयक्तिक नोट शेअर केली. गेल्या वर्षाच्या शेवटी मित्र, आमच्या टीमला आणि कुटुंबीयांना हिंडेनबर्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. संशोधनाच्या संकल्पनांच्या आमचे सुरु असलेले प्रकल्प पूर्ण केल्यानंतर कंपनी बंद करण्याचा विचार होता. हिंडेनबर्ग रिसर्चनं काही दिवसांपूर्वी त्यांचा शेवटचा प्रोजेक्ट पाँझी स्कॅमबाबतचा पूर्ण केला होता. 

इतर बातम्या :

Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?

 (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: युद्धज्वर शिगेला, सराफा बाजारात सोने- चांदीच्या दरवाढीला मात्र ब्रेक; जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
युद्धज्वर शिगेला, सराफा बाजारात सोने- चांदीच्या दरवाढीला मात्र ब्रेक; जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Iran America war unemployment: आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
Mhada : मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget