एक्स्प्लोर

फक्त 405 रुपयांची गुंतवणूक करा, करोडपती व्हा; सविस्तर माहिती एका क्लिकवर 

तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला त्यावर मोठे व्याजही मिळेल. या दोन्ही सुविधा तुम्हाला एकाच सरकारी योजनेत मिळतील. या योजनेचं नाव सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) आहे.

PPF Scheme: अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व वाढताना दिसत आहे. गुंतवणूक करताना नागरिकांनी दोन गोष्टींचा विचार करणं महत्वाचं आहे. एक म्हणजे आपली ठेव सुरक्षीत का आहे का? आणि दुसरी गोष्टी आपल्या ठेवीवर किती परतावा मिळतोय? या दोन्हीचा विचार करणं महत्वाचं आहे. दरम्यान, तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला त्यावर मोठे व्याजही मिळेल. या दोन्ही सुविधा तुम्हाला एकाच सरकारी योजनेत मिळतील. या योजनेचं नाव सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) आहे. सामान्य भाषेत त्याला पीपीएफ म्हणतात. ही देशातील सर्वात लोकप्रिय लहान बचत योजनांपैकी एक आहे.

देशातील अनेक लोक पीपीएफमध्ये पैसे गुंतवतात. यामध्ये गुंतवणुकीवर एक पैसाही गमावला जात नाही. कारण केंद्र सरकार या योजनेची हमी घेते.

गुंतवणुकीची मर्यादा काय? 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेत तुम्ही वार्षिक किमान 500 रुपये गुंतवू शकता आणि कमाल मर्यादा 1.5 लाख रुपयांपर्यंत आहे. आर्थिक वर्षात 1.5 लाखांपेक्षा जास्त जमा केलेल्या रकमेवर कोणतेही व्याज उपलब्ध नाही. रक्कम एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये जमा केली जाऊ शकते. याला मर्यादा नाही.

PPF वर किती व्याज मिळते?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी बँका आणि पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवींपेक्षा जास्त व्याज देते. सध्या सरकार पीपीएफवर वार्षिक 7.1 टक्के व्याज देत आहे. गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते. ज्याची गणना वार्षिक आधारावर केली जाते. दरवर्षी मार्चमध्ये व्याज दिले जाते. दर तीन महिन्यांनी म्हणजे त्रैमासिक आधारावर व्याजदरांचे पुनरावलोकन केले जाते. व्याजदराबाबत अंतिम निर्णय अर्थ मंत्रालय घेते.

PPF वर कर सवलतीचा लाभ मिळतो का?

करमुक्तीच्या दृष्टिकोनातून ही एक उत्कृष्ट योजना आहे. त्यामुळं नोकरदार लोकांमध्ये ती खूप लोकप्रिय आहे. पीपीएफमध्ये पैसे जमा करुन, तुम्ही चांगल्या रिटर्न्ससह कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. तुम्ही आयकराच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवू शकता, ज्याची कमाल मर्यादा 1.5 लाख आहे. पीपीएफमधील गुंतवणूक, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम, तिन्ही पूर्णपणे करमुक्त आहेत. पीपीएफमध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते.

PPF मध्ये किती वर्ष गुंतवणूक करावी लागेल?

सरकारी नियमांनुसार पीपीएफ योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. जर तुम्हाला मॅच्युरिटीनंतरही चालू ठेवायचे असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही पीपीएफ खाते 5 वर्षांसाठी वाढवू शकता. पीपीएफ विस्तारासाठी अर्ज मॅच्युरिटीच्या एक वर्ष आधी करावा लागेल.

आपत्कालीन परिस्थितीत निधी काढता येतो का?

 या सरकारी योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे असला तरी, आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही ठेव रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकता. यासाठी अट अशी आहे की खाते उघडल्यानंतर 6 वर्षे पूर्ण झाली पाहिजेत, म्हणजेच 6 वर्षानंतरच रक्कम काढता येईल.

रकमेवरील कर्जाची सुविधा नेमकी काय? 

पीपीएफ खाते तीन वर्षे चालवल्यानंतर तुम्ही त्यावर कर्जही घेऊ शकता. खाते उघडल्याच्या तिसऱ्या ते सहाव्या वर्षापर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. पहिले कर्ज बंद झाल्यानंतरच दुसरे कर्ज लागू केले जाऊ शकते. पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 25 टक्के रक्कम तुम्ही कर्ज घेऊ शकता. पीपीएफच्या कर्जावर 2 टक्के जास्त व्याज द्यावे लागेल. उदाहरणार्थ, जर PPF वर सध्याचा व्याजदर 7.1 टक्के असेल, तर खातेदाराला कर्जावर 9.1 टक्के व्याज द्यावे लागेल. कर्जाची परतफेड जास्तीत जास्त 36 महिन्यांत करावी लागेल.

PPF खाते उघडण्याचा नियम काय? 

पीपीएफ खात्यात गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. पोस्ट ऑफिससह देशातील जवळपास सर्व सरकारी आणि खासगी बँकांमध्ये तुम्ही पीपीएफ खाते उघडू शकता. यासाठी भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. तुम्ही अल्पवयीन मुलांच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकता, परंतू, यासाठी पालक असणे अनिवार्य आहे. मुलाच्या खात्यातून मिळणारी कमाई पालकांच्या उत्पन्नात जोडली जाते.

पीपीएफ खाते बंद करता येईल का?

नियमांनुसार, पीपीएफ खाते उघडल्यानंतर 5 वर्षांपर्यंत ते बंद करण्याची परवानगी नाही. यानंतर, केवळ काही प्रकरणांमध्ये ते बंद करण्याची तरतूद आहे. जसे की खातेदार, जोडीदार, आश्रित मुले किंवा पालकांना प्रभावित करणारे जीवघेणे आजार. या कारणांवर दावा करण्यासाठी वैद्यकीय कागदपत्रे आवश्यक आहेत. याशिवाय खातेधारकाच्या मृत्यूनंतर खाते आपोआप बंद होते.

पैसे जमा करण्याचा विशेष नियम काय? 

जर तुम्ही PPF मध्ये पैसे जमा करत असाल तर ते महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जमा करा, म्हणजे तुम्हाला त्या संपूर्ण महिन्याचे व्याज मिळेल. पण जर तुम्ही पीपीएफ खात्यात त्या महिन्याच्या 6 तारखेपर्यंत किंवा शेवटच्या तारखेपर्यंत पैसे जमा केले, तर पुढील महिन्यापासून त्यावर व्याज जोडले जाईल. प्रत्येक महिन्याच्या 5 व्या दिवसाच्या शेवटी आणि शेवटच्या दिवसाच्या दरम्यानच्या किमान शिल्लक रकमेवर व्याज मोजले जाते.

PPF योजनेच्या माध्यमातून करोडपती कसं व्हाल? 

या सरकारी सुरक्षित योजनेत थोडे थोडे पैसे जमा करुन तुम्ही करोडपती होऊ शकता. दररोज फक्त 405 रुपये जोडून म्हणजेच वार्षिक 1,47,850 रुपये, तुम्ही सध्याच्या 7.1 टक्के व्याजदरावर आधारित 25 वर्षांत एकूण 1 कोटी रुपये उभारू शकता. पीपीएफ कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही स्वतः आकडे पडताळून पाहू शकता.

महत्वाच्या बातम्या:

तुम्ही घरात किती रोख रक्कम ठेऊ शकता? आयकर विभागाचा नेमका नियम काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
Sanjay Raut : राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'
राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'
Beed Crime: नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
Devendra Fadnavis : महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं परिवहन मंत्र्यांना धक्का, एसटीचं अध्यक्षपद कुणाकडे?
एकीकडे पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा परिवहन मंत्र्यांना धक्का, एसटीच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines11 AM TOP Headlines 11AM 06 February 2024ABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00AM 06 February 2025Pune Sanjiv Nimbalkar Income Tax : संजीवराजे निंबाळकरांच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणीVijay Wadettiwar Full PC : धनंजय मुंडे यांच्या मुखात मी कधीही OBC ऐकलं नाही,वडेट्टीवार कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
Sanjay Raut : राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'
राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'
Beed Crime: नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
Devendra Fadnavis : महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं परिवहन मंत्र्यांना धक्का, एसटीचं अध्यक्षपद कुणाकडे?
एकीकडे पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा परिवहन मंत्र्यांना धक्का, एसटीच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय
Anjali Damania : धनंजय मुंडेंच्या 'त्या' दाव्यामागचे सत्य एबीपी माझाकडून समोर, अंजली दमानिया म्हणाल्या; 'आता तरी या माणसाला...'
धनंजय मुंडेंच्या 'त्या' दाव्यामागचे सत्य एबीपी माझाकडून समोर, अंजली दमानिया म्हणाल्या; 'आता तरी या माणसाला...'
Shirish Maharaj More : 20 एप्रिलला लग्न अन् शिरीष महाराज मोरेंनी उचललं टोकाचं पाऊल, होणाऱ्या बायकोसाठी लिहिले अखेरचे शब्द; म्हणाले, माझी लाडाची पिनू...
20 एप्रिलला लग्न अन् शिरीष महाराज मोरेंनी उचललं टोकाचं पाऊल, होणाऱ्या बायकोसाठी लिहिले अखेरचे शब्द; म्हणाले, माझी लाडाची पिनू...
शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधाला ब्रेक लागणार? लाडकी बहीणचा खर्च, तिजोरीतील खडखडाट, कंत्राटदारांची देणी यामुळं मोठा निर्णय?
अर्थसंकल्पात शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधाला ब्रेक लागणार? राज्याच्या तिजोरीतील खडखडाटामुळं मोठा निर्णय?
Dhananjay Munde : बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर सर्वात कमी दराने खरेदी केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा; 'एबीपी माझा'च्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक माहिती समोर!
बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर सर्वात कमी दराने खरेदी केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा; 'एबीपी माझा'च्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक माहिती समोर!
Embed widget