एक्स्प्लोर

Internet Cable Owner : सागरी इंटरनेट केबल्समुळं संपूर्ण जग जोडलं जातं, ऑप्टिकल फायबर केबल्सची मालकी कुणाकडे? उत्तर जाणून बसेल आश्चर्याचा धक्का

Under Sea Internet Cable : जगातील वेगवेगळ्या देशांना इंटरनेटनं जोडण्यासाठी सर्वात मजबूत आणि विश्वासार्ह पद्धत समुद्राच्या तळाशी असलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्स आहे. 

नवी दिल्ली : सध्या इंटरनेट सुरु असणं ही प्रत्येकाची गज बनली आहे. सोशल मिडिया, व्हिडिओ कॉल, ऑनलाईन शॉपिंग, यूट्यूब, ऑफिसचं काम इंटरनेटवर अवलंबून असते. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का इंटरनेट कुठून येतं. अनेक लोकांना इंटरनेट आकाशातून म्हणजेच सॅटेलाईट किंवा मोबाईल टॉवर द्वारे येतं असं वाटतं. मात्र, जगातील 99 टक्के इंटरनेट समुद्राच्या तळाशी असलेल्या ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून येतं. म्हणजेच इंटरनेट आकाशातून नव्हे तर समुद्राच्या तळाशी असलेल्या केबलमधून येतं. 

जगातील विविध देशांना इंटरनेटद्वारे जोडण्याचा मजतूब आणि विश्वासार्ह मार्ग म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेल्या ऑप्टिकल फायबर केबल हा आहे. या केबल हजारो किलोमीटर लांबीच्या असतात. ज्या समुद्राच्या तळाशी टाकलेल्या असतात. यापद्धतीनं जगातील एका भागातून दुसऱ्या भागात इंटरनेटद्वारे डेटा पाठवला जातो आणि स्वीकारला जातो. इंटरनेटच्या समुद्राच्या तळाशी असलेल्या केबलचं मालक कोण असतं जाणून घेऊयात

इंटरनेट केबल्सचा इतिहास (Internet Cables History)

इंटरनेट केबल्सची सुरुवात 1830 च्या दशकात झाली होती. जेव्हा टेलिग्राफची सुरुवात झाली होती. त्यावेळी संदेशवहनासाठी तारसेवा वापरली जायची.  त्यानंतर 1858 मध्ये अमेरिकेचे उद्योजक सॉयरस वेस्टफील्ड यांनी अटलांटिक महासागराच्या तळाशी पहिली टेलिग्राफ केबल टाकली.ज्याद्वारे अमेरिका आणि ब्रिटन जोडले गेले. ही केबल फार दिवस चालली नाही, मात्र ती सुरुवात होती. 1866 मध्ये पहिली स्थायी अंडर सी केबल यशस्वीपणे टाकण्यात आली. ज्यानंतर समुद्राच्या तळाशी टेलिग्राफ आणि इंटरनेट केबल्स टाकण्यात आल्या. 

सध्या जगाला जोडणाऱ्या 14 लाख किलोमीटर लांबीच्या अंडर सी केबल्स आहेत. जगातील 99 टक्के इंटरनेट त्या केबल्समधून येतं. भारतात बहुतांश इंटरनेट सागरी केबल्स मधून येतं. जवळपास 95 टक्के  इंटरनॅनशल डेटा ऑप्टिक फायबर केबल्स द्वारे देशात येतो. भारतात एकूण 17 इंटरनेट केबल्स येतात ज्या 14 सागरी स्टेशन्स सोबत जोडलेल्या आहेत. ही स्टेशन प्रामुख्यानं मुंबई, चेन्नई , कोचीन, तूतीकोरिन, त्रिवेंद्रम मध्ये आहेत. या ठिकाणी समुद्राच्या तळातून केबल्स येतात. तिथून देशाच्या विविध भागात इंटरनेट पोहोचवलं जातं. 

समुद्राच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबलची मालकी कुणाकडे? 

इंटरनेट समुद्राच्या तळाशी असलेल्या हजारो किलोमीटर लांबीच्या फायबर ऑप्टिक केबलच्या माध्यमातून पोहोचतं. समुद्राच्या तळाशी असलेल्या फायबर ऑप्टिक केबलची मालकी सरकारकडे नसते. म्हणजेच भारत सरकार किंवा अमेरिका सरकारकडे मालकी नसते. ऑप्टिक फायबर केबलची मालकी खासगी टेलिकॉम किंवा तंत्रज्ञान कंपन्या असतात. ज्यांच्याकडे आवश्यक पैसे, तंत्रज्ञान आणि संसाधनं असतात,त्याद्वारे ते समुद्राच्या तळाशी असलेल्या केबल्सची देखभाल करतात, त्याचा वापर करुन इंटरनेट डेटा जगभरात पाठवतात. भारतात ज्या कंपन्या अंडरसी केबल्स टाकण्याचं आणि चालवण्याचं काम करतात त्या देशातील इंटरनेट कनेक्शनचा आधार आहेत. या कंपन्यांमध्ये टाटा कम्युनिकेशन्स, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, सिफी टेक्नोलॉजीज आणि बीएसएनलचा समावेश आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget