कोरोना संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत, जाणून घ्या नेमके काय झाले बदल?
कोरोनाच्या संकटानंतर (Corona Crisis) भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने बदलली आहे, त्याचा फायदाही होत आहे. जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्था अजूनही कोरोनाच्या प्रभावातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.
Indian Economy : भारत आता जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Indian Economy) बनली आहे. लवकरच ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Economy) बनेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कोरोनाच्या संकटानंतर (Corona Crisis) भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने बदलली आहे, त्याचा फायदाही होत आहे. जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्था अजूनही कोरोनाच्या प्रभावातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच भारताची अर्थव्यवस्था मात्र, खूप पुढे गेली आहे.
कोरोनाच्या संकटाने भारतासह जगातील अनेक मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेला हादरा दिला आहे. त्यानंतर, जगातील अनेक देश आपली अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात भारताची अर्थव्यवस्था मात्र, वेगानं प्रगती करत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.कोरोनानंतर जगाला चीन व्यतिरिक्त इतर देशात पुरवठा साखळी स्थापन करण्याची गरज भासू लागली.त्यानंतर बहुतेक कंपन्यांची पहिली पसंती म्हणून भारत उदयास आला. Apple ने आपला कारखाना भारतात हलवणे हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. त्यासाठी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेतही बदल केले आहेत.
कोविडनंतर भारताची अर्थव्यवस्था मजबूत
कोविडनंतर भारताने आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली. कोरोना संकटाच्या काळात भारतानं संधी शोधून आपला 'मेक इन इंडिया' उपक्रम पुढे नेला. उत्पादनाशी संबंधित असलेले उपक्रम पूर्वीपेक्षा अधिक मजबूत केले. याचा फायदा असा झाला की एकामागून एक अनेक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी भारतात उत्पादन वाढवले. आज भारतात विकले जाणारे सर्व मोबाईल इथेच बनवले जातात. एवढेच नाही तर भारताने वैद्यकीय उपकरणे, सेमीकंडक्टर, ऑटो मोबाईल आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीवरही आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे.
यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा
कोरोनाच्या प्रभावाचा झपाट्यानं सामना करण्यात भारताने कोणतीही कसर सोडली नाही. सरकारनं देशभरात वेगाने लसीकरण केले, तर चीनने हेच काम करण्यासाठी बराच काळ संघर्ष केला. त्यामुळं देशाची अर्थव्यवस्था लवकर रुळावर येऊ शकते. त्याचवेळी, भारतीय अर्थव्यवस्थेत लवचिकतेचा आणखी एक ट्रेंड होता. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयने व्याजदरात सातत्याने वाढ केली असताना, त्यात काही प्रमाणात स्थिरता आल्यावर व्याजदर बदलणे थांबवले. जगातील इतर देश महागाईशी झुंजताना दिसत असताना भारताने मात्र, महागाई नियंत्रणात ठेवल्याचे सरकारनं म्हटलं आहे.
आपण भारताच्या आर्थिक प्रगतीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत देशाची GDP वाढ सुमारे 7.8 टक्के होती. यामुळं भारताची अर्थव्यवस्था 484.94 अब्ज डॉलर इतकी आहे. जर आपण पहिल्या सहामाहीतील निर्यातीवर नजर टाकली तर ती 211.40 अब्ज डॉलरची पातळी ओलांडली आहे. भारताने आता ब्रिटनला मागे टाकून जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. जी 2027 पर्यंत जपानला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: