भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत CRISIL चा नवा अंदाज, 2031 पर्यंत GDP मध्ये किती होणार वाढ?
CRISIL Report : भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत ( Indian Economy) वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातायेत. क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने (CRISIL) देखील अर्थव्यवस्थेबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
CRISIL Report : भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत ( Indian Economy) वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातायेत. क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने (CRISIL) देखील अर्थव्यवस्थेबाबत अंदाज व्यक्त केला आहे. क्रिसिलने भारताच्या अर्थव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. 2024 ते 2031 पर्यंत भारताचा GDP 6.7 टक्के दराने वाढण्याचा अंदाज CRISIL ने व्यक्त केला आहे.
क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने (CRISIL) भारताच्या अर्थव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. CRISIL च्या अलीकडील अहवालात असा अंदाज आहे की 2024 ते 2031 पर्यंत भारताचा GDP 6.7 टक्के दराने वाढेल. येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग संतुलित राहील, असे क्रिसिलने म्हटले आहे. सरकारकडून मिळणाऱ्या भांडवली पाठिंब्यामुळे अर्थव्यवस्था गतिमान राहील.
पुढील वर्षात GDP 6.4 टक्के राहील
क्रिसिलने आपल्या अहवालात पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपीचा विकास दर 6.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारताचा जीडीपी स्थिरतेकडून वाढीकडे जात आहे. सध्या 2031 पर्यंत यावर कोणताही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज क्रिसिलने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. CRISIL च्या मते, सरकारची आर्थिक धोरणे GDP ची वाढ सुनिश्चित करत आहेत. याशिवाय खासगी क्षेत्राचेही यामध्ये पूर्ण सहकार्य मिळत आहे. सरकारने भांडवली खर्चाला चालना दिली आहे. याशिवाय राज्यांना बिनव्याजी कर्ज देऊन सरकार गुंतवणुकीला चालना देत आहे.
चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 7.3 टक्के असूनही, क्रिसिलने पुढील आर्थिक वर्षात जीडीपी 6.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षांचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. याचा ऊर्जा क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचं क्रिसिलने म्हटले आहे. याशिवाय शिपिंग खर्च वाढल्यामुळं आयात-निर्यात महाग होऊ शकते. याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये भारतातील चलनवाढीचा दर 5.7 टक्के होता. देशात भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. खाद्यपदार्थांमध्ये येणारी ही महागाई लक्षात घेण्यासारखी असल्याचं क्रिसिलने म्हटलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महागाई दर 4 टक्के ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पण, खाद्यपदार्थांच्या किमतींवर नियंत्रण ठेवले नाही तर हे लक्ष्य गाठणे फार कठीण होऊ शकते. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देखील कमी होऊ शकतात असा अंदाज क्रिसिलने व्यक्त केला आहे.
क्रिसिलची स्थापना 1987
क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया (CRISIL) ही SEBI नोंदणीकृत क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. ही भारताची पहिली रेटिंग एजन्सी आहे. क्रिसिलची स्थापना 1987 मध्ये झाली आहे.
महत्वाच्या बातम्या: