First Billionaire : सोन्याच्या हिऱ्याच्या खाणी, 1000 कोटीचा जेकब डायमंड, 'हा' होता जगातील पहिला सर्वात श्रीमंत माणूस
तुम्हाला भारतातीलच नाहीतर जगातील पहिला सर्वात श्रीमंत व्यक्ती (India First Billionaire) कोण होता? याबाबतची माहिती आहे का? ज्या व्यक्तीकडे सोन्याच्या हिऱ्याच्या खाणीसह 1000 कोटीचा जेकब डायमंड होता.
First Billionaire : ज्या ज्या वेळी देशातील सर्वात श्रीमंतांची चर्चा होते, त्यावेळी मुकेश अंबानी (Mukesh Ambani), गौतम अदानी (Gautam Adani), टाटा-बिर्ला या उद्योगपतींची चर्चा होते. पण तुम्हाला भारतातीलच नाहीतर जगातील पहिला सर्वात श्रीमंत व्यक्ती (India First Billionaire) कोण होता? याबाबतची माहिती आहे का? ज्या व्यक्तीकडे सोन्याच्या हिऱ्याच्या खाणी होत्या. 1000 कोटीचा जेकब डायमंड (Jacob Diamond) होता. त्याची संपत्ती एकूण तुम्हाला नक्कीच धका बसेल. हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान (Nizam Mir Usman Ali Khan) असं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
1940 मध्ये 236 अब्ज डॉलर्सची संपत्ती
निजाम मीर उस्मान अली खान यांच्याकडे सोन्याच्या आणि हिऱ्याच्या खाणी होत्या. त्याच्या बागेत सोन्याच्या विटांनी भरलेले ट्रक उभे असायचे. तसेच त्यांच्याकडं 185 कॅरेटचा जेकब डायमंड देखील होता. 1940 मध्ये त्यांची संपत्ती 236 अब्ज डॉलर्स होती. ते केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्याकडे असणाऱ्या 185 कॅरेटच्या जेकब डायमंडची किंमत 1000 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला होता. तसेच निजाम मीर उस्मान अली खान यांच्याकडे सोन्याच्या आणि हिऱ्याच्या खाणी देखील होत्या.
देश स्वतंत्र झाल्यावर हैदराबादच्या निजामाने भारताऐवजी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला
मिळालेल्या माहितीनुसार, 1940 पर्यंत त्यांची संपत्ती 236 बिलियन डॉलरवर पोहोचली होती. असे असूनही ते त्यांच्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध होते. ते साधा कुर्ता पायजमा घालायचे. ते अनेकदा साध्या चप्पल आणि शूजमध्ये दिसत होते. हैदराबादच्या निजामाच्या बेडरूममध्ये एक जुना पलंग होता. तिथे साधे फर्निचर होते. हे पाहता ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते असं कोणालाही वाटत नव्हते. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर हैदराबादच्या निजामाने भारताऐवजी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर सप्टेंबर 1948 मध्ये भारतीय लष्कराला हैदराबादवर हल्ला करावा लागला. याला ऑपरेशन पोलो असे म्हणतात. त्यामुळे निजामाची राजवट संपुष्टात आली. शिवाय त्यांची संपत्तीही सरकारकडे गेली. दरम्यान, मीर उस्मान अली खान यांची साझी राहणी असली तरी देखील ते केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मीर उस्मान अली खान हे त्याकाळी सर्वात श्रीमंत असूनही त्यांच्या कंजूषपणाची आजही चर्चा होते.
महत्वाच्या बातम्या:
Corrupt Indian Billionaire: हिरो ते झिरो! विजय माल्ल्या ते चंदा कोचर, क्षणात कंगाल झाले 7 अब्जाधीश