Income Tax Return (ITR) : 31 डिंसेबर 2021 पूर्वी भरा आयटी रिटर्न; अन्यथा, भरावा लागेल दंड
Income Tax Return (ITR) Filing Deadline by 31 December : आयटी रिटर्न्स भरण्याची 31 डिसेंबर ही शेवटची तारीख जवळ येत आहे. वेळेत आयटी रिटर्न भरण्याचे अनेक फायदेही असतात.
Income Tax Return (ITR) Filing Deadline by 31 December : जर तुम्ही अद्याप 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी आयटी रिटर्न भरले नसेल, तर तुमच्याकडे चार दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरताना दंड भरणं टाळायचं असेल, तर 31 डिसेंबरपूर्वी आयटी रिटर्न भरावं. अन्यथा दंड भरावा लागेल.
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 26 डिसेंबर 2021 पर्यंत 4.51 कोटीहून अधिक करदात्यांनी आयकर रिटर्न्स भरले आहेत. ज्यामध्ये 26 डिसेंबर रोजी केवळ 8.7 लाख करदात्यांनी आयटी रिटर्न भरले आहेत. इन्कम टॅक्स विभागानं ट्वीट करून ही माहिती दिली आहे. यासोबतच प्राप्तिकर विभागानंही लोकांना लवकरात लवकर आयटी रिटर्न भरण्याचे आवाहन केले आहे.
31 डिसेंबर 2021 नंतर दंड भरावा लागणार
आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 नंतर मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी रिटर्न भरले असेल तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. आणि जर तुम्ही 31 मार्च 2022 नंतर मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरला तर 10,000 रुपये दंड भरावा लागेल. त्यामुळे, जर तुम्हाला दंड भरणं टाळायचं असेल, तर तुम्ही 31 डिसेंबर 2022 पूर्वी तुमचं आयटी रिटर्न भरलं पाहिजे.
दंडाची नेमकी तरतूद काय आहे?
टॅक्स भरताना कोणती काळजी घ्याल?
टॅक्सची अचूक माहिती द्या
आयटी रिटर्न्स भरताना टॅक्सची पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. यातून अॅडव्हान्स टॅक्स, टीडीएसची माहिती सरकारला द्यावी लागते. जर कमी टॅक्स भरला तर आयटी रिटर्न्समध्ये टॅक्स भरण्याची संधी मिळेल. तसंच जास्त टॅक्स जमा झाला असेल तर रिफंड मागितला जाऊ शकतो.
वर्ष आणि फॉरमॅट तपासून घ्या
आयटी रिटर्न्स भरताना मूल्यनिर्धारण वर्ष आणि त्याचा फॉरमॅट नीट तपासून घ्या. कारण वेगवेगळ्या टॅक्सपेअर्ससाठी फॉरमॅटही वेगळा असतो. तसंच प्रत्येक वर्षी हा फॉरमॅट बदललाही जातो. म्हणूनच तुमचा फॉरमॅट नीट तपासून घेणं गरजेचं आहे.
मिळालेल्या व्याजाचाही उल्लेख करा
तुमच्या सेव्हिंग बँक अकाऊंटवर आणि फिक्स डिपॉझिटवर जे व्याज मिळालं असेल त्याचाही उल्लेख फॉर्ममध्ये करा. व्याजातून मिळालेली रक्कम तुमच्या ग्रॉस इनकममध्ये अॅड करणं गरजेचं आहे. तुमची बँक स्टेटमेंट्स तपासली तर ही व्याजाची रक्कम जाणून घेण्यासाठी मदत होऊ शकेल.
मिळालेल्या व्याजाचाही उल्लेख करा
तुमच्या सेव्हिंग बँक अकाऊंटवर आणि फिक्स डिपॉझिटवर जे व्याज मिळालं असेल त्याचाही उल्लेख फॉर्ममध्ये करा. व्याजातून मिळालेली रक्कम तुमच्या ग्रॉस इनकममध्ये अॅड करणं गरजेचं आहे. तुमची बँक स्टेटमेंट्स तपासली तर ही व्याजाची रक्कम जाणून घेण्यासाठी मदत होऊ शकेल.
अचूक बँक डिटेल्स
आयटी रिटर्न्स भरताना अचूक बँक डेटल्स पुरवणं हेदेखील फार महत्वाचं आहे. चुकीची बँक डिटेल्स दिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. ही सर्व काळजी घेतली तर तुम्हाला आयटी रिटर्न्स भरताना येणाऱ्या अडचणींवर मात करणं सोपं होईल.