एक्स्प्लोर

आयटी रिटर्न भरण्यासाठी शेवटचा दिवस, IT return न भरल्यास काय होईल?

जर करदात्यांनी वेळेत आयकर भरला नाही, तर 5 हजार रुपये ते 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

मुंबई: आयकर विवरणपत्र अर्थात आयटी रिटर्न भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यावर्षी वेळेत आयकर भरला नाही तर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी आयकर भरण्यास उशीर झाला तर दंडाची कोणतीही तरतूद नव्हती. यावर्षी आयकर कायद्यामध्ये 234 F हे कलम वाढवण्यात आलं आहे. यानुसार आज जर कर भरला नाही तर 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. खरंतर दरवर्षी टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जलै असते आणि दरवर्षी तरीख वाढवली जाते. त्याप्रमाणे यंदाही केंद्र सरकारने आयकर दात्यांना एक महिन्याचा अवधी वाढवून दिला आहे. जर करदात्यांनी वेळेत आयकर भरला नाही, तर 5 हजार रुपये ते 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. दंडाचे नियम काय आहेत?
  1. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांहून कमी आहे आणि तुम्ही 31 ऑगस्टनंतर आयटी रिटर्न भरलात, तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल.
  2. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यीं 31 ऑगस्टनंतर आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.
  3. 5 लाख रुपयांहून जास्त उत्पन्न असलेल्यांनी 31 जुलै ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत आपलं आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.
  4. 5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांनी 31 डिसेंबर 2018 नंतर आयटी रिटर्न भरल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.
दंडाची नेमकी तरतूद काय आहे? आयकर अधिनियम 1961 मध्ये कलम 234-F समाविष्ट करण्यात आले आहे. हे कलम 1 एप्रिल 2018 पासून लागू झाले आहे. यामध्ये नियोजित  मुदतीत आयकर न भरल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. आयटी रिटर्न भरण्यासाठी टिप्स आयटी रिटर्न कसं भरायचं हा आपल्यासमोर मोठा प्रश्न असतो. मात्र आपण थोडी जरी माहिती घेतली, तरी आयटी रिटर्न भरणं किती सोपं आहे हे आपल्याला कळेल. आपण नवा मोबाईल घेतल्यानंतर त्यातील फंक्शन्स कसे ऑपरेट करायचे हे आपल्याला माहित नसतं. मात्र आपण एकदा त्यामध्ये लक्ष घातलं की सगळं समजायला लागतं, तसंच आयटी रिटर्नच्या बाबतीतही लागू आहे. आयटी रिटर्न भरण्यासाठी टिप्स इथे क्लिक करा. संबंधित बातम्या  करदात्यांना दिलासा, आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढवली!   आयटी रिटर्न कसे भरावे? सोप्या टिप्स! 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Maharashtra Goverment Cabinet Decision मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Embed widget