![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Income Tax Filing : ITR भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस, सहा कोटी लोकांनी दाखल केलं आयकर विवरण
Income Tax Filing : आयकर विवरण दाखल करण्याचा उद्या (31 जुलै 2023) शेवटचा दिवस आहे. रविवारी 6 कोटींहून अधिकजणांनी ITR भरला आहे.
![Income Tax Filing : ITR भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस, सहा कोटी लोकांनी दाखल केलं आयकर विवरण Income Tax Filing updates nearly 6 crore filing ITR 31st July Is The Last Year Income Tax Filing : ITR भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस, सहा कोटी लोकांनी दाखल केलं आयकर विवरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/30/29dc5d488c0e997cdf450419ccc815bb1690724221113290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Income Tax Filing : आयकर विवरण भरण्यासाठी आता उद्या शेवटचा दिवस (Last Day For ITR Filing) आहे. रविवार दुपारपर्यंत 6 कोटी नागरिकांनी आयकर विवरण (Income Tax Return) दाखल केले असल्याची माहिती आयकर विभागाने दिली. 31 जुलै 2023 ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. सध्या तरी सरकारने मुदत वाढवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. गेल्या वर्षीही मुदत वाढवण्यात आली नव्हती.
आयकर विभागाने ट्वीट करत म्हटले की, "आज (30 जुलै) दुपारी 1 वाजेपर्यंत 5.83 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 31 जुलैपर्यंत दाखल केलेल्या ITR पेक्षाही ही अधिक संख्या अधिक आहे. आज दुपारपर्यंत 46 लाख अधिक यशस्वी लॉगिन झाले आहेत. शनिवारी 1.78 कोटींहून अधिक लॉगिन करण्यात आले होते. रविवारी, दुपारी 1 वाजेपर्यंत 10.39 लाख आयटीआर दाखल झाल्याची माहितीही विभागाने दिली.
📢 Kind Attention 📢
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 30, 2023
Here are some statistics of the Income Tax Returns filed.
5.83 crore #ITRs have been filed till 1 pm today (30th July) crossing the number of ITRs filed till 31st July, last year.
We have witnessed more than 46 lakh successful logins till 1 pm today and…
परतावा मिळाल्यानंतरही ITR मध्ये करू शकता बदल
आयकर विभागाने करचोरी विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत आयकर रिटर्न भरताना करदात्यांनी आयकर विवरणात त्यांच्या उत्पन्नाची योग्य माहिती दिली पाहिजे याची काळजी घेतली जाते. अनेक वेळा करदाते बँक खात्यातील ठेवींच्या व्याज उत्पन्नाबद्दल योग्य माहिती देऊ शकत नाहीत किंवा चुकीच्या कपातीचा दावा करू शकत नाहीत. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. इतकेच नाही तर आयकर विभागाकडून कमी परतावा मिळाल्यास त्याविरुद्ध अपील करण्याचीही तरतूद आहे.
सुधारित विवरणपत्र 139(5) अंतर्गत भरा
आयकर कायद्यांतर्गत आयकर रिटर्न भरल्यानंतरही तुम्ही तुमचा आयटीआर पुन्हा दुरुस्त करू शकता. आयकर कायद्याच्या कलम 139(5) अंतर्गत, करदाते सुधारित आयकर रिटर्न भरून आयटीआरमध्ये झालेल्या चुका सुधारू शकतात. या कायद्यानुसार, आयटीआर भरल्यानंतर, जर करदात्याला असे वाटत असेल की त्याने काही बाबी जाहीर केल्या नाहीत अथवा चूक झाली आहे. तर, तो सुधारित आयकर विवरण दाखल करू शकतो.
प्रोसेसिंग-रिफंड मिळाल्यानंतरही सुधारित आयकर रिटर्न भरण्यास मुभा
करदात्यांना ही दिलासा देणारी बाब आहे की त्यांच्या आयकर रिटर्नवर प्रक्रिया झाली असली तरी ते कलम 139(5) अंतर्गत ऑनलाइन रिव्हाइज रिटर्न भरू शकतात. करदात्याच्या आयटीआरची प्रक्रिया केली गेली आहे आणि त्याला परतावा जारी केला गेला आहे, अशा प्रकरणांमध्ये, रिफंड मिळाल्यानंतरही, आयटीआर दुरुस्त करण्यासाठी करदाता सुधारित रिटर्न दाखल करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)