PAN-Aadhar Link : पॅनकार्ड आधार लिंक 31 मे पूर्वी करा, आयकर विभागाकडून ट्विट करत अपडेट, अन्यथा बसेल फटका
PAN Aadhar link: आयकर विभागानं करदात्यांसाठी महत्त्वाची सूचना दिली आहे. करदात्यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्डलिंक करण्यासंदर्भात सूचना केली आहे.
नवी दिल्ली: जर तम्ही करदाते असाल तर तुमच्यासाठी आयकर विभागानं (Income Tax) महत्त्वाची सूचना जारी केली आहे. करदात्यांनी 31 मार्च पूर्वी त्यांचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड (PAN Card-Aadhar Linking) लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नाही तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. आयकर विभागानं अधिकृतपणे ट्विट करत माहिती दिली आहे.
टीडीएस दुप्पट आकारला जाणार
आयकर विभागाच्या नियमानुसार ज्या करदात्यांचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसेल त्यांना दुप्पट टीडीएस द्यावा लागणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस कडून 24 एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार ज्यांचे पॅन कार्ड निष्क्रीय करण्यात आलं आहे त्यांच्या टीडीएस आकारणीत चूक झाल्याची नोटीस मिळालं आहे. या प्रकाराच्या प्रकरणामध्ये डिडक्शन आणि कलेक्शन जादा दरानं होत नाही. अशा प्रकरणांमध्ये सविस्तर माहिती मागवली जात आहे. सीबीडीटीनं म्हटलं की 31 मार्च 2024 पर्यंत ज्या खात्यात व्यवहार झाले आहेत त्यांनी 31 मे 2024 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक असून तसं केल्यास अधिक टीडीएस वसूल केला जाणार नाही.
Kind Attention Taxpayers,
— Income Tax India (@IncomeTaxIndia) May 28, 2024
Please link your PAN with Aadhaar before May 31st, 2024, if you haven’t already, in order to avoid tax deduction at a higher rate.
Please refer to CBDT Circular No.6/2024 dtd 23rd April, 2024. pic.twitter.com/L4UfP436aI
पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास काय होणार?
आयकर विभागाच्यावतीनं पॅनकार्ड धारकांना सूचना देण्यात आली आहे की जर एखादा करदाता 31 मे पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक करु शकला नाही तर त्यांना दुप्पट टीडीएस भरावा लागेल. त्यामुळं लवकरात लवकर पॅन आणि आधार लिंक करावं, असं आवाहन आयकर विभागानं केलं आहे.
पॅन आणि आधार कार्ड कसं लिंक करणार?
स्टेप 1 : तुम्ही आयकर विभागाची वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्या.
स्टेप 2 : तिथे Quick Links या सेक्शनवर क्लिक करा, तिथं Link Aahar वर क्लिक करा,
स्टेप 3 : पॅन कार्ड आणि आधार क्रमांक नोंदवून Validate वर क्लिक करा.
स्टेप 4 : यानंतर आधार कार्डमध्ये असलेलं नाव, मोबाईल नंबर नोंदवून Link Aadharवर क्लिक करा
स्टेप 5 : मोबाईल नंबर नोंदवून त्यावर येणाऱ्या ओटीपीसह Validate वर क्लिक करा.
संबंधित बातम्या :
कधी सोन्याचा दर गगनाला, तर कधी घसरण; चार दिवसांत 2500 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नेमकं कारण काय?
RBI: आयसीआयसीआय बँकेला 1 कोटींचा तर येस बँकेला 91 लाखांचा दंड, आरबीआयचा दोन्ही बँकांना दणका, कारण...