आयकर विभागाचा टाटा समूहाला दणका, 'या' कंपनीला 104 कोटींचा दंड, शेअर्समध्ये मोठी घसरण
टाटा ग्रुपसाठी (Tata Group) एक निराशजनक बातमी आहे. व्याज नाकारण्याच्या मुद्यावरुन आयकर विभागानं टाटा समूहाच्या एका कंपनीला 103.63 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Tata Group Share market: टाटा ग्रुपसाठी (Tata Group) एक निराशजनक बातमी आहे. व्याज नाकारण्याच्या मुद्यावरुन आयकर विभागानं टाटा समूहाच्या एका कंपनीला 103.63 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याचा मोठा फटका टाटा ग्रुपला बसला आहे. या स्थितीमुळं गेल्या पाच दिवसांत टाटा केमिकल्सच्या शेअर्स 9 टक्क्यांची घसरण झाल्याची माहिती मिळाली आहे. याचा गुंतवणुकदारांना देखील फटका बसलाय.
सध्या टाटा केमिकल्सच्या समभागात 0.46 टक्क्यांची वाढ झाली असली तरी मागील आठवड्यात कंपनीला मोठा फटका बसलाय. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा मोठा फटका बसला आहे. कंपनीला व्याज नाकारल्याबद्दल आयकर विभागानं 103.63 कोटी रुपयांचा दंड केला आहे. याप्रकरणी टाटा केमिकल्स कंपनीने आयकर विभागाच्या आदेशाविरुद्ध राष्ट्रीय फेसलेस अपील केंद्रासमोर अपील केलं आहे. त्यामुळं आता पुढचा निर्णय काय लागणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, बुधुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण झाली होती. आज मात्र, शेअर्समध्ये 9 टक्क्यांची घसकण झालीय. जर या कंपनीत कोणी 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्यांचे 9 हजार रुपयांचे नुकसान झाले असते.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, टाटा केमिकल्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर म्हणजेच 1,349.70 रुपयांवर आहे. तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 922.20 आहे. गेल्या एका महिन्यात टाटा केमिकल्सच्या शेअर्समध्ये जवळपास 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतू, गेल्या 6 महिन्यांत स्टॉकची कामगिरी फ्लॅट आहे. या शेअरनं या वर्षी आतापर्यंत 7 टक्के निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. याचा मोठा फटका गुंतवणुकदारांना बसला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Tata Group : टाटांच्या 'या' कंपनीचे होणार विभाजन, गुंतवणूकदारांच्या शेअर्सचे काय होणार?