बेदाण्याला मिळणार झळाळी, शालेय पोषण आहारात समावेश केल्यानं शेतकरी खुश; स्वाभिमानीकडून पेढे वाटून स्वागत
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) दिलासा देणार निर्णय सरकारनं घेतला आहे. बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश केला आहे.
Bedana News : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) दिलासा देणार निर्णय सरकारनं घेतला आहे. बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश केला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण, या निर्णयामुळं बेदण्याला दराची झळाळी येणार आहे. दरम्यान, शासणाच्या या निर्णयाचं सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आणि पेढे वाटून स्वागत केलं. सांगली जिल्ह्यातील पावणे तीन लाख तर राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थांना याचा लाभ मिळणार आहे.
स्वाभिानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश
शेतकर्यांचा मालाला चांगला दर मिळावा, तसेच मुलांना अधिक पौष्टिक आहार मिळावा यासाठी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा असा आग्रह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातत्यानं धरला होता. अखेर त्यांच्या या मागणीला यश आलं आहे. याबाबत शासन अद्यादेश काढण्यात आला असून हे आमच्या लढ्याचे यश असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलाय. आता बेदाणा खरेदी व्यापार्याकडून न करता थेट शेतकर्यांकडून करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात येत होती. त्यासाठी मोर्चे, आंदोलने देखील करण्यात आली होती. अखेर शेतकऱ्यांचा शेतीमाल असणाऱ्या बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जल्लोष साजरा केला.
हजारो बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळणार
शालेय पोषण आहारात बेदाणे देण्याबाबत देखील निर्णय झाल्याने याचा फायदा हजारो बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. सध्या द्राक्षाला भाव नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी बेदाणे प्रक्रिया उद्योग सुरु केला. मात्र बेदाण्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. आता पोषण आहारात त्याचा समावेश केल्याने बेदाणा निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळं मुलांचा शाररिक आणि बौद्धिक विकास झपाट्याने होण्यास मदत मिळणार आहे. शिवाय ग्रामीण भागातील मुलांचा शाळेकडे ओढा वाढण्यासही मदत होणार आहे. मुलांना विविध प्रोटीन मिळाल्याने विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होऊन गुणवत्ता वाढीमध्ये त्यास अधिक लाभ होईल असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
महत्वाच्या बातम्या:
Sangli News: सांगलीत गळ्यात बेदाणा हार घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; फुकट बेदाण्याचे वाटप करून सरकारचा निषेध