मजुरांसाठी खुशखबर! सरकार देणार विशेष ओळखपत्र, एकाच छताखाली मिळणार सरकारी योजनांचा लाभ
केंद्र सरकारनं (Central Govt) मजुरांसाठी (Labor) खास ओळखपत्र बनवण्याची घोषणा केली आहे. कामगारांसाठी हे कार्ड गेम चेंजर ठरणार आहे.
ID Card for Labor : केंद्र सरकारनं (Central Govt) मजुरांसाठी (Labor) खास ओळखपत्र बनवण्याची घोषणा केली आहे. कामगारांसाठी हे कार्ड गेम चेंजर ठरणार आहे. त्याच्या मदतीनं, ते सरकारद्वारे चालवल्या जाणार्या विविध योजनांचा लाभ सहज मिळवू शकणार आहेत. तसेच कंत्राटदारांवरही अंकुश ठेवण्याचे काम करतील. केंद्र सरकार गरीब, मजूर आणि शेतकरी यांच्या फायद्यासाठी सतत योजना आणते. परंतु अनेक वेळा त्यांचे खरे फायदे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. हा विशेष आयडी त्यांच्यासाठी एक शस्त्र म्हणून काम करेल आणि बांधकाम कामात गुंतलेल्या स्थलांतरित मजुरांना त्याचा विशेष फायदा होईल.
विशेष ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केले जाईल
कामगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विशेष ओळखपत्र मजुरांचे आधार कार्ड आणि ई-श्रम डेटाबेसशी जोडले जाईल. यासंदर्भात सविस्तर घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. आरती आहुजा म्हणाल्या की, मंत्रालय कामगारांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. पायाभूत सुविधा आणि इमारत बांधकामातील बहुतांश मजूर कंत्राटावर घेतले जातात. त्यांना रोजंदारीवर काम दिले जाते. त्यांना रोख पैसे देऊन कामावर घेतले जाते. गरज संपल्यावर केव्हाही काढून टाकले जाते. तसेच, कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला जात नाही. यामुळेच अनेक योजनांच्या लाभापासून ते वंचित आहेत. हे मजूर कामाच्या शोधात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. त्यामुळं त्यांना प्रत्येक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. अपघात झाला तरी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना विशेष लाभ मिळत नाही.
कामगारांसाठी केलेले कायदे पाळले जात नाहीत
कामगारांच्या कल्याणासाठी केलेले किमान वेतन, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, लहान मुलांसाठी स्वच्छतागृहे आणि क्रॅच इत्यादी कायद्यांचे कंत्राटदारांकडून फारसे पालन केले जात नाही. त्यामुळं ही नवीन कार्डे बनवून सरकार त्यांना विविध योजनांच्या कक्षेत आणणार आहे. तसेच अशा मजुरांचे कोणत्याही प्रकारे शोषण होणार नाही. हे विशेष कार्ड बनवल्यानंतर कंत्राटदारांना शासनाचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: