(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GST Collection :ऑगस्ट महिन्यात जीएसटी कलेक्शन 1,12 कोटींवर; 31 टक्क्यांनी वाढ
महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 मध्ये जीएसटी महसुलाचे संकलन 11,602 कोटी रुपये इतके होते, तर ऑगस्ट 2021 मध्ये जीएसटी महसुलाचे संकलन 15,175 कोटी रुपये झाले. महसुलात 31% ची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : जुलै महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन 31 टक्क्यांनी वाढून 1.12 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. ऑगस्टमधील जीएसटी महसूल आकडेवारुन लक्षात येते की कोरोना संकटानंतर अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये जीएसटी संकलन 98, 202 कोटी रुपये होते. यापूर्वी, गेल्या महिन्यात म्हणजे जुलै, 2021 मध्ये जीएसटी संकलन 1.16 लाख कोटी रुपये होते.
जीएसटी महसूल 1,12,020 कोटी रुपये
आकडेवारीनुसार, ऑगस्ट, 2021 मध्ये एकूण जीएसटी महसूल 1,20,020 कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्रीय जीएसटी 20,522 कोटी रुपये, राज्य जीएसटी 26,605 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी 56,247 कोटी रुपये (त्यापैकी 26,884 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवर जमा झाले) आणि उपकर 8.646 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर 646 कोटी रुपये जमा झाले.)
ऑगस्ट, 2020 मध्ये जीएसटी संकलनाचा आकडा एक वर्षापूर्वीच्या याच महिन्याच्या तुलनेत 30 टक्के अधिक आहे. यामध्ये 1 ते 31 ऑगस्टपर्यंत भरलेले जीएसटी रिटर्न, त्याच कालावधीसाठी आयजीएसटी आणि मालाच्या आयातीवर जमा केलेला सेस यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 मध्ये जीएसटी महसुलाचे संकलन 11,602 कोटी रुपये इतके होते, तर ऑगस्ट 2021 मध्ये जीएसटी महसुलाचे संकलन 15,175 कोटी रुपये झाले. महसुलात 31% ची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सलग नऊ महिन्यांपर्यंत 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी संकलन झाल्यानंतर कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे ते जून 2021 मध्ये कमी होऊन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाले. कोविड संबंधित निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट 2021 मध्ये जीएसटी संकलनाने पुन्हा 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे हे स्पष्ट निदर्शक आहे. आर्थिक विकासासोबतच, कर-चोरीविरोधी कारवाई, विशेषतः बनावट बिले करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईने देखील जीएसटी महसूल वाढविण्यात योगदान दिले. आगामी महिन्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीएसटी महसूल संकलन होण्याची शक्यता आहे