एक्स्प्लोर

Gold Silver Price : सोन्याच्या दरात किरकोळ वाढ तर चांदीच्या दरात 400 रुपयांची घसरण

Gold Silver Price : मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 46,580 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,580 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीचा भाव हा 71,600 रुपये इतका आहे. 

मुंबई : शनिवारी बाजार बंद होताना सोन्या-चांदीच्या भावात काही किरकोळ चढ-उतार पहायला मिळाली. आज रविवारी, सोन्याच्या किंमतीत 90 रुपयांची वाढ झाली असून मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 46,580 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,580 रुपये इतका आहे. काल हाच दर 47,490 रुपये इतका होता. 

गेल्या काही दिवसांचा विचार करता स्थिर असलेले सोन्याचे भाव हे बदलत आहेत. 20 मे रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,000 रुपये होता, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 47,000 हजार रुपये होता. त्यानंतर 21 मेपासून 26 मेपर्यंत सोन्याचे भाव स्थिर असल्याचं पाहायला मिळत होतं. बुधवारी अचानक त्यामध्ये तेजी आली आणि 800 रुपयांनी तो वधारला. गुरुवारी पुन्हा त्यामध्ये 200 रुपयांची घट झाल्याचं पहायला मिळालं. आज रविवारी त्यामध्ये पुन्हा 90 रुपयांची वाढ झाली आहे.  

शुक्रवारी चांदीचा दर हा 72,000 रुपये इतका होता. आज त्यामध्ये 400 रुपयांची घसरण झाली असून ती किंमत 71,600 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 16 मे रोजी चांदीचा दर प्रतिकिलो 71,000 हजार रुपये इतका होता. तर 18 मे रोजी तो प्रतिकिलो 74,000 हजारांवर पोहोचला. पुन्हा 19 मेपासून चांदीच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं. 19 मे रोजी प्रतिकिलो 73,000 रुपये, 20 मे रोजी प्रतिकिलो 72,300 रुपये, 21 मे रोजी प्रतिकिलो 71,200 रुपये, 22 मे प्रतिकिलो 71,100 रुपयांपर्यंत चांदीच्या दरात घट झाली. त्यानंतर 23 मे रोजी चांदीच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली, तर 24 मे रोजी चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली होती. तर 25 आणि 26 मे रोजी चांदीच्या दरात 300 रुपयांची घट झाली होती. 28 मे रोजी चांदीच्या भावात 600 रुपयांनी वाढ होऊन ती 72,000 वर पोहोचली होती. आता त्या किंमतीत 400 रुपयांची घट होऊन 71,600 रुपयांवर पोहोचली आहे. 

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो. 

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास 11 हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. 

महत्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget