एक्स्प्लोर

गायीचे दूध की शाकाहारी दूध? शाकाहारी दूध आहे तरी काय?

गाईच्या दुधाच्या ऐवजी वॅगन मिल्क म्हणजेच शाकाहारी दूध उत्पादनाकडे वळावे त्यातच भविष्य आहे असे पेटा ने एका पत्राद्वारे अमूल कंपनीला कळवले आहे.

मुंबई : पेटा म्हणजेच पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स या संस्थेने भारतातल्या सर्वात मोठ्या सहकारी तत्त्वावरील दूध उत्पादक कंपनीला एक अजब सल्ला दिला आहे. अमूल या कंपनीने आता गाईच्या दुधाच्या ऐवजी वॅगन मिल्क म्हणजेच शाकाहारी दूध उत्पादनाकडे वळावे त्यातच भविष्य आहे असे पेटा ने एका पत्राद्वारे अमूल कंपनीला कळवले आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. 

अमूल कंपनीच्या सीईओ आर. एस. सोडी यांनी मात्र पेटा ने दिलेल्या या सल्ल्याचा विरोध केलाय. सोधी यांनी जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक अश्विनी महाजन यांनी केलेल्या ट्विटला रिट्विट करत आपला पाठिंबा दिला आहे. 

सोडी म्हणतात, 'जर अमूल कंपनीने गाईच्या दुधाचे उत्पादन थांबवलं तर भारतातल्या 10 कोटी शेतकऱ्यांना रोजगार कोण देणार? आपल्याला माहिती नाही का बहुतेक दूधउत्पादक शेतकरी भूमिहीन असतात. आपल्या सल्यामुळे त्यांचे उपजीविकेचे एकमेव साधन नष्ट होईल. आपल्या परंपरेतच दुधाचा वापर आहे. त्यामुळे शाकाहारी दुधाच्या मागे लागणे योग्य नाही'.

अमूल कंपनीच्या प्रतिक्रियेवर देखील पेटा इंडियाकडे उत्तर आहे. 'शाकाहारी दुधाकडे मिळाल्यास शेतकऱ्यांचे रोजगार जाणार नाहीत उलट यामुळे प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबतील आणि दुधापासून आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम देखील होणार नाहीत. भारतात गायींना दूध देण्यासाठी त्रास दिला जातो, त्यांना दुभते ठेवले जाते, जेव्हा त्यांचे शरीर दूध देणे बंद करते तेव्हा त्यांना कत्तलखान्यात विकले जाते आणि मांस मिळवले जाते', असे पेटा इंडियाचे म्हणणे आहे.

Covid-19 : कोरोनापासून बचाव अन् रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयनं सांगितले उपाय

महाराष्ट्र दूध उत्पादनात देशातील एक अग्रेसर राज्य मानले जाते. 2020 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दिवसाला एक कोटी 40 लाख लीटर इतक्या दुधाचे उत्पादन होते. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या दोन हजार अठरा एकोणीस च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 11 हजार 655 टन इतके वार्षिक दूध उत्पादन केले जाते. त्यामुळे दूध उत्पादनावर अवलंबून असणारे शेतकरी देखील लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहेत. त्यांना मात्र हा सल्ला मुळीच पटलेला नाही. 

पेटा इंडिया ने सांगितलेले शाकाहारी दूध म्हणजे नेमके काय ? 

शाकाहारी दुधाचे अनेक प्रकार सध्या जगात उपलब्ध आहेत. शाकाहारी दूध हे नारळ काजू बदाम आणि मुख्यतः सोया पासून बनवली जाते. सध्या बाजारात अनेक नागरिक या दुधाला पसंती देत आहेत. गाईच्या दुधापेक्षा शाकाहारी दूध हे जास्त फायदेशीर असते असा दावा देखील पेटा इंडिया ने केला आहे. 

पेटा इंडिया ने दिलेला सल्ला अमूल इंडिया कंपनीने धुडकावून लावला असला तरी, यावर चर्चा ही होणारच. गाईला देवी म्हणून पूजा करणाऱ्या भारतात तिच्यापासून मिळालेले दूध प्रसाद म्हणून पिण्याची परंपरा आहे. मग असा भारत बदलेल का? 

श्रीकृष्ण हा देखील गवळी होता. त्यामुळे गाय आणि तिच्यापासून मिळणारे दूध याचा संबंध हा थेट अध्यात्माशी जोडला गेला आहे. इतकेच नाही तर भारतीय शेतकरी आर्थिक दृष्ट्या देखील गाईंवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. म्हणूनच गाईला कामधेनू म्हटले जाते, मग अशा या भारतात पेटा इंडियाने सांगितल्याप्रमाणे खरंच बदल होऊ शकेल का हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो.

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Metro : CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Rahul Gandhi SC Petition : राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव
राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव
CJP And GEN Z Protest Maowadi Connection: CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
Embed widget