Gold Silver Rate Today : भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला सोने-चांदी भेट देण्याचा विचार करताय? आजचे दर जाणून घ्या
Gold Silver Price : आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल, तर आजचा सोने-चांदीचा भाव काय आहे, ते पाहा.
Gold Silver Rate Today : तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा आज भाऊबीन निमित्ताने बहिणीसाठी भेट म्हणून सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला आजचे दर जाणून घेणं आवश्यक आहे. आज सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. देशात आज 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे, ते पाहा. आज देशात सोन्याचा भाव 24 कॅरेटसाठी 60,600 रुपये आणि 22 कॅरेटसाठी 55,550 रुपये आहे.
आज सोने-चांदीच्या दरात वाढ
गुड रिटर्न्सनुसार, आज 15 नोव्हेंबरला प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price on 14 Nov 2023) 55,550 रुपये आहे.18 कॅरेट सोने खरेदीची किंमत 45,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोने-चांदीचे दर शहरानुसार बदलतात.
आज चांदीचा दर काय?
आज सोन्याप्रमाणे आज चांदीच्या दरातही वाढ (15 November 2023 Silver Price Today) झाली आहे. चांदीचा भाव आज 600 रुपयांनी वाढला असून आजचा दर 73,000 रुपये प्रति किलो आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत चांदीच्या दरात 600 रुपयांनी घट झाली आहे. चांदीच्या दरात घसरण होत आहे.
आज भारतातील प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत
ग्रॅम | आजचे 22 कॅरेट सोने (₹) | काल 22 कॅरेट सोने (₹) | दैनंदिन किंमत बदल (₹) |
1 ग्रॅम | 5,555 | 5,545 | +10 |
8 ग्रॅम | 44,442 | 44,360 | +80 |
10 ग्रॅम | 55,550 | 55,450 | +100 |
100 ग्रॅम | 5,55,900 | 5,54,500 | +1,000 |
आज भारतातील प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत
ग्रॅम | आजचे 24 कॅरेट सोने (₹) | काल 24 कॅरेट सोने (₹) | दैनंदिन किंमत बदल (₹) |
1 ग्रॅम | 6,060 | 5,545 | +11 |
8 ग्रॅम | 48,480 | 48,392 | +88 |
10 ग्रॅम | 60,600 | 60,490 | +110 |
100 ग्रॅम | 6,06,600 | 6,04,500 | +1,100 |
महत्त्वाच्या इतर बातम्या :