गोल्ड लोनवर सर्वोत्तम ऑफर देणाऱ्या बँका कोणत्या? सविस्तर माहिती एका क्लिकवर
सोने गहान ठेवल्याबरोबर लगेच बँका कर्ज (Bank Loan) देतात. यामध्ये कागदपत्रांची पूर्तता कमी असते. गोल्ड लोनवर (Gold Loan) सर्वोत्तम ऑफर देणाऱ्या बँकांची यादी पाहुयात.
Gold Loan Rate : अनेक बँका (Bank) सोन्याचे दागिने गहाण ठेऊन कर्ज देतात. सोने गहान ठेवल्याबरोबर लगेच बँका कर्ज (Bank Loan) देतात. यामध्ये कागदपत्रांची पूर्तता कमी असते. त्यामुळं लगेच पैसे मिळतात. इतर ठिकाणी गृहकर्ज आणि कार लोनसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. गोल्ड लोनवर (Gold Loan) सर्वोत्तम ऑफर देणाऱ्या बँकांची यादी
युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया सर्वात स्वस्त सोन्याचे कर्ज 8.7 टक्के दराने देत आहे. यामध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी 5 लाख रुपयांच्या सोने कर्जावरील ईएमआय 22,610 रुपये असणार आहे.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया दोन वर्षांच्या कालावधीसाठी 5 लाख रुपयांच्या सुवर्ण कर्जावर 8.8 टक्के व्याज आकारत आहे. यामध्ये 22,631 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.
कॅनरा बँक
कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक दोन वर्षांसाठी सुवर्ण कर्जावर 9.25 टक्के व्याज देत आहेत. 5 लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर ईएमआय 22,725 रुपये असेल.
एचडीएफसी बँक
खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँक दोन वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या सोने कर्जावर 8.5 टक्के व्याजदर आकारते. यामध्ये तुम्हाला मासिक ईएमआय 22,568 रुपये असणार आहे.
ॲक्सिस बँक
ॲक्सिस बँक दोन वर्षांच्या कालावधीसह 5 लाख रुपयांच्या सुवर्ण कर्जावर 17 टक्के व्याज दर आकारते. कर्जदारांचा ईएमआय 24,376 रुपये असेल.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) दोन वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या सोने कर्जावर 9.6 टक्के व्याज आकारत आहे. यावर 22,798 रुपयांचा मासिक ईएमआय भरावा लागेल.
इंडियन बँक
इंडियन बँक 2 वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर 8.65 टक्के दराने गोल्ड लोन देते. यावरील मासिक हप्ता तुम्हाला 22,599 रुपये आहे.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा 5 लाख रुपयांच्या दोन वर्षांच्या सुवर्ण कर्जावर 9.4 टक्के व्याज आकारत आहे. यावर बँक 22,756 रुपये मासिक ईएमआय आकारते.
आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँक दोन वर्षांच्या कालावधीसह 5 लाख रुपयांच्या सुवर्ण कर्जावर 10 टक्के व्याज आकारते. कर्जदारांना 22,882 रुपये ईएमआय भरावा लागेल.
गोल्ड लोन म्हणजे काय?
गोल्ड लोन हा सुरक्षित कर्जाचा एक प्रकार आहे. जिथे व्यक्ती त्यांचे सोने तारण ठेवून पैसे घेतात. कर्जदार सोन्याच्या मूल्यावर आधारित कर्जाची रक्कम ठरवतो. हे विस्तृत दस्तऐवजीकरणाशिवाय निधीमध्ये त्वरित प्रवेश प्रदान करते. यामध्ये कमी व्याजदर असतो. तसेच तातडीने कर्ज मिळते.
महत्वाच्या बातम्या: